पर्यटन मंत्रालय

2020-21 साठी पर्यटन मंत्रालयाच्या 1260.00 कोटी रुपयांच्या सुधारित मंजूर खर्च आराखड्याच्या तुलनेत 2021-22 वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 2026.77 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली

Posted On: 10 FEB 2021 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021

 

पर्यटन मंत्रालयासाठी 2020-21 साठी 1260.00 कोटी रुपयांच्या सुधारित मंजूर खर्च आराखड्याच्या तुलनेत 2021-22 वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 2026.77 कोटी रुपये इतकी आहे. पर्यटन क्षेत्राला लाभदायक  विविध अर्थसंकल्पीय तरतुदींविषयी माहिती देताना पर्यटन सचिव अरविंद सिंह म्हणाले की, आर्थिक वर्ष 2021-22 मधील वार्षिक खर्चासाठी तरतूद ही आर्थिक वर्ष 2020-21 मधील सुधारित वार्षिक खर्चापेक्षा  61% जास्त आहे.

2026.77 कोटी रुपयांच्या प्रस्तावित तरतुदीपैकी सुमारे 950 कोटी रुपये विविध राज्यांमधील विविध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी तर 670 कोटी रुपये पर्यटनाला चालना देणाऱ्या कामांवर खर्च केले जातील, असे सचिवांनी स्पष्ट केले. उर्वरित निधी सेवा प्रदात्यांसाठी क्षमता निर्मिती, चॅम्पियन सेवा क्षेत्र योजना यासारख्या योजनांसाठी वापरला जाईल, असे सचिव म्हणाले.

द्रुतगती मार्गांच्या विकासामुळे  या मार्गांवरील पर्यटन स्थळांना चांगली संपर्क व्यवस्था मिळेल व देशातील पर्यटन क्षेत्राच्या वाढीला आणि विकासाला हातभार लागेल असेही अरविंद सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरी तसेच ग्रामीण भागात वेलनेस सेंटर सुरू केल्याने देशात निरामय आरोग्य पर्यटनाला चालना मिळेल व आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा प्रसार होईल असेही ते म्हणाले.

Click here for more details

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696877) Visitor Counter : 104


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi