दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुंबई टपाल विभागांतर्गत पेन्शनधारकांसाठी 15 मार्च रोजी पेंशन अदालत
Posted On:
10 FEB 2021 5:45PM by PIB Mumbai
मुंबई, 10 फेब्रुवारी 2021
टपाल विभागाच्या पेंशन / परिवार पेंशन घेणाऱ्या व्यक्तिंसाठी पोस्टमास्टर जनरल, मुंबई क्षेत्र, मुंबई यांच्या द्वारे सोमवार, दिनांक १५.०३.२०२१ रोजी ११.०० वाजता, पोस्टमास्टर जनरल, मुंबई क्षेत्र,यांचे कार्यालय,जीपीओ बिल्डिंग मुंबई- ४०० ००१ येथे पेंशन अदालत चे आयोजन करण्यात येत आहे.
पेंशन / परिवार पेंशन घेणाऱ्या व्यक्तिंनी आपले अर्ज खाली दिलेल्या प्रोफार्मा मध्ये वरिष्ठ लेखा अधिकारी, पोस्टमास्टर जनरल मुंबई क्षेत्र यांचे कार्यालय, जीपीओ बिल्डिंग, मुंबई- ४०० ००१ ह्या पत्त्यावर २०.०२.२०२१ पर्यंत मिळतील अशा रीतीने पाठवावेत. २०.०२.२०२१ ह्या तारखेनंतर मिळणाऱ्या अर्जाचा पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. कायदेशीर बाबी, धोरणात्मक निर्णय (पॉलिसी), बद्दलच्या तक्रारी पेंशन आदालत मध्ये विचारात घेतल्या जाणार नाहीत.
टपाल पेंशन अदालतच्या अर्जाचा प्रोफार्मा
* * *
RT/MC/DR/PMG-Mumbai
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696834)
Visitor Counter : 59