संरक्षण मंत्रालय
काश्मीर महिला क्रिकेट संघाने पुण्याला भेट दिली आणि दक्षिणी कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांच्याशी संवाद साधला
प्रविष्टि तिथि:
09 FEB 2021 7:55PM by PIB Mumbai
पुणे, 9 फेब्रुवारी 2021
09 फेब्रुवारी 2021 रोजी, दक्षिणी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथील महिला क्रिकेट संघाशी पुणे येथील मुख्यालय दक्षिणी कमांड येथे असीम फाउंडेशनच्या सदस्यांसमवेत संवाद साधला. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील सर्व महिला क्रिकेटपटूचा संघ 04 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान पुणे आणि मुंबईला भेट देणार आहे.पुणे स्थित असीम फाउंडेशन आणि भारतीय सैन्याच्या पुढाकाराने सीमावर्ती भागाला देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या भेटीचे आयोजन केले आहे.

यावेळी साधलेल्या संवादात लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी, महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत दुर्गम भागात विकासास प्रोत्साहन देण्याच्या दिशेने भारतीय लष्कराच्या सातत्यपूर्ण पाठिंबा आणि संकल्पांचा पुनरुच्चार केला. सर्व प्रकारच्या कृतीमध्ये प्रामाणिकपणा, समर्पण, कठोर परिश्रम आणि नम्रतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. स्थानिक विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये सामील होण्यासाठी तयार करण्याच्या सुपर 30 उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक निकालामुळे या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे आणि केंद्रशासित प्रदेशातील आयआयटी इच्छुकांमध्ये ते खूप लोकप्रिय आहे. लष्कराच्या कमांडरनी यावेळी खेळाडूंशी संवाद साधला आणि महिला क्रिकेट संघ आणि असीम फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्याचा सत्कार केला आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित केले.

हा संघ पुण्यात स्थानिक महिला संघाबरोबर चार मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने खेळणार असून या दौऱ्यात ते मुंबईलाही भेट देणार आहेत. काल, या संघाने औंध लष्करी तळाला भेट दिली , जिथे त्यांनी शिवनेरी ब्रिगेडच्या अधिकारी आणि सैन्याशी संवाद साधला आणि लष्करी जीवनाविषयी आणि प्रशिक्षण उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली .
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1696607)
आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English