कृषी मंत्रालय

शेतीवर हवामान बदलाचा परिणाम

Posted On: 09 FEB 2021 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

 

गेल्या तीन दशकांमध्ये संपूर्ण भारतात  तापमान आणि अतिवृष्टीच्या  घटनांमध्ये  वाढ झाल्यामुळे हवामानात लक्षणीय  बदल दिसून आला आहे.  यामुळे वेगवेगळ्या वर्षांत प्रमुख पिकांच्या उत्पादनात चढ-उतार होत गेले.

नॅशनल इनोव्हेशन इन  क्लायमेट रेसिलींएंट  एग्रीकल्चर (एनआयसीआरए) अंतर्गत भारतीय शेतीवर हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास केला गेला. 2050 आणि 2080 मध्ये भारतामध्ये पर्जन्याधारित  तांदळाच्या उत्पादनात  किरकोळ (<2.5%) घट आणि सिंचन तांदळाच्या उत्पादनात 2050 मध्ये 7% आणि 2080 मध्ये  10% घट होण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, गव्हाचे उत्पादन 2100 मध्ये 6-25 टक्के आणि मक्याचे उत्पादन 18-23 टक्क्यांनी  कमी होण्याचा अंदाज आहे. भविष्यातील हवामानाचा चण्याला फायदा होण्याची शक्यता असून उत्पादनात (23-54%) वाढ होऊ शकेल.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने  (आयसीएआर) भारतीय शेतीवरील हवामान बदलांच्या प्रभावाकडे  लक्ष देण्यासाठी 2011 मध्ये NICRA हा  नेटवर्क प्रकल्प सुरू केला. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि  आयसीएआरचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय देखरेख समिती (एचएलएमसी) द्वारे  NICRA प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला , ज्यामध्ये केंद्र  सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांचे प्रतिनिधीत्व निमंत्रित सदस्यांनी केले. या समितीने  बदलत्या हवामानानुसार भारतीय शेती अधिक परिस्थिती अनुरूप लवचिक बनविण्यासाठी  NICRA एनआयसीआरएच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय एखादी तज्ज्ञ समिती नियमितपणे या प्रकल्पाचा आढावा घेते आणि विविध बाबींवर सल्ला देते.

हवामान बदलाप्रति भारतीय शेतीच्या संवेदनशीलतेचे  मूल्यांकन भारतीय कृषी संशोधन परिषदेने  (आयसीएआर) हाती घेतले  आहे. हे  मूल्यांकन भारतातील 573 ग्रामीण जिल्ह्यांसाठी आहे. (केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटे , लक्षद्वीप वगळता). संवेदनशीलतेच्या  विश्लेषणाच्या आधारे, 573 ग्रामीण जिल्ह्यांपैकी 109 जिल्हे  'अति-जोखीम' जिल्हे आहेत, तर 201 जिल्हे जोखीम जिल्हे आहेत.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696545) Visitor Counter : 3656


Read this release in: English