वस्त्रोद्योग मंत्रालय
हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन
Posted On:
04 FEB 2021 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांने देशभरातील हातमाग विकास आयुक्त कार्यालयाच्या सहयोगाने महात्मा गांधींची जुलै 2019 ते 2 ऑक्टोबर 202 ही 150 वी जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली होती. वर नमूद केलेल्या कालावधीत विविध विणकर सेवा केंद्रातून खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
- महात्मा गांधींच्या 150व्या जयंती निमित्त खादीचे सूत वापरुन केलेल्या विविध नमुन्यांचे प्रदर्शन विणकर सेवा केंद्रांमधून आयोजित केले होते.
- खादी सूत वापरून नमुने तयार करण्यासाठी काही विणकर सेवा केंद्रांनी माग बसवले.
- काही विणकर सेवा केंद्रांनी खादीच्या साड्या, शोभेच्या वस्तू रंगवण्यासाठी नैसर्गीक रंगांचा वापर केला आणि अभ्यागताना त्याचे प्रात्यक्षिक दिले. वेगवेगळे नैसर्गीक धागे व हातमागाचे प्रकार यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विभागात प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते.
- विणकर सेवा केंद्रांतून आयोजित प्रदर्शनातून नैसर्गिक आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध धाग्यांचा वापर हातमाग क्षेत्रात वाढावा व नैसर्गीक रंगांच्या वापराने पर्यावरणस्नेही वातावरण तयार व्हावे याबद्दल जागृतीवर भर दिला गेला.
- खादीची वस्त्रे व उत्पादने बनवण्यसाठी विणकर व मुख्य विणकरांना प्रशिक्षण देण्यात आले.
- राष्ट्रीय खादी दिनी वनस्पतींपासून रंग तयार करणे व त्या रंगांचा वापर यावर प्रात्यक्षिक घेतले गेले. या सोहळ्याच्या कालावधीत विणकर सेवा संघाकडून अनेक प्रदर्शनांचे आयोजन केले गेले.
- आंतरराष्ट्रीय योग आणि महिला दिनी, खादीचे नमुने सहभागींना दिले आणि त्यांना खादीचे महत्व तसेच नैसर्गीक धागे व रंग वापरलेल्या हातमागावरील कापड्याच्या वापराचे फायदे पटवून दिले.
- वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695326)
Visitor Counter : 120