संरक्षण मंत्रालय

लढाऊ विमानांची कमतरता

Posted On: 03 FEB 2021 9:01PM by PIB Mumbai

 

काळानुसार जुन्या होणाऱ्या व कालबाह्य सामग्रीमुळे लढाऊ ताफ्यातील विमानांची संख्या कमी होते. या कमतरतेवर नियोजित नवीन ताफ्यांचा समावेश करून मात करता येते. ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया असते.

तेजस- Mk-IA (TEJAS Mk-IA) या स्वदेशात अभिकल्पित, विकसित व उत्पादित केलेल्या  लढाऊ विमानांच्या 4 ताफ्यांचा समावेश करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. एकूण 83 तेजस- Mk-IA (TEJAS Mk-IA) चे HAL मध्ये उत्पादन करून भारतीय हवाई दलात समावेश करण्याचे नियोजित केले आहे.

संरक्षण क्षेत्र स्वयंपूर्ण होण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

***

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694942) Visitor Counter : 116


Read this release in: English , Tamil