संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन संचलन 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय छात्रसेनेच्या कॅडेट्सचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार
Posted On:
02 FEB 2021 4:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलन 2021 मध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सच्या महाराष्ट्र राज्य पथकाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोमवारी (1 फेब्रुवारी 2021) सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात एनसीसी कार्यक्रमांशी संबंधित पारंपारिक शिस्तीचे दर्शन घडले. या पथकात 26 अत्यंत उत्साही छात्रसैनिकांचा समावेश होता, ज्यांनी राज्याचा गौरव वाढवला. या कार्यक्रमाला एनसीसी संचालनालय महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी. खंडूरी, तसेच राज्य सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पात्र छात्रसैनिकांना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती देण्यात आली.

प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर 30 जानेवारी 2021 रोजी हे पथक मुंबईत परतले. महाराष्ट्र एनसीसीच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि प्रतिष्ठित पंतप्रधानांच्या बॅनरसाठी देशभरातील 17 संचालनालयांमधून उपविजेतेपद पटकावले. महामारीच्या कठीण परिस्थितीत उत्तम कॅडेट्सची न्याय्य निवड आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल एनसीसी संचालनालय महाराष्ट्रच्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

तपशीलवार बातमीसाठी कृपया येथे क्लिक करा
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694446)
Visitor Counter : 150