माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ऍनिमेशन आणि लघुपटांच्या प्रदर्शनाने होणार स्वच्छता पंधरवडा 2021 चा समारोप

प्रविष्टि तिथि: 30 JAN 2021 7:43PM by PIB Mumbai

 

मुंबई, 30 जानेवारी 2021

स्वच्छता पंधरवडा – 2021 च्या समारोपाचा भाग म्हणून, फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने 31 जानेवारी 2021 रोजी वेबसाइट आणि यू ट्यूब चॅनेलवर स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे निवडक ऍनिमेशन आणि लघुपटांचे ऑनलाइन स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष पॅकेजमध्ये महात्मा गांधीजींची स्वच्छतेबाबतची तत्वे सांगणारा `मेरे बापू` (10 मिनिटे) हा लघुपट, त्यानंतर `धामनेर` (9 मिनिटे), `चिमू` (4 मिनिटे), `चर्चगेट फास्ट` (3 मिनिटे), `मिस्टर क्लीन कम्स टू सिटी` (3 मिनिटे), `पाइड पाइपर ऑफ मुंबई` (4 मिनिटे) आणि `हिसाब दो` (3 मिनिटे) या लघुपटांचा समावेश आहे. हे विशेष पॅकेज 31 जानेवारी 2021 रोजी  फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर दाखविले जाणार आहे.

https://filmsdivision.org/  येथे भेट द्या आणि ``Documentary of the week`` येथे क्लिक करा किंवा

https://www.youtube.com/user/FilmsDivision  येथे चित्रपट पाहण्यासाठी फॉलो करा आणि चित्रपटांचा आनंद घ्या.

S.Kane/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1693615) आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English