सांस्कृतिक मंत्रालय
इतिहास, वारसा, विज्ञान आणि रेल्वे यांच्यासह एक अद्भुत भेट
भारताचे पहिले स्वदेशी लढाऊ विमान मारुत नागरिकांना पाहण्यासाठी खुले
नेहरू विज्ञान केंद्राने रेल्वे इंजिन पुन्हा समर्पित केले
Posted On:
26 JAN 2021 7:29PM by PIB Mumbai
मुंबई, 26 जानेवारी 2021
औद्योगिक क्रांतीला प्रोत्साहन देण्यामध्ये परिवहनाची भूमिका मोलाची आहे. प्राण्यांपासून सुरू झालेली आणि नंतर वाफेवरील इंजिन आणि इलेक्ट्रिक इंजिन वाहतुकीच्या प्रत्येक पद्धतीने जगाला कायापालट करण्यास मदत केली आहे. वाहतुकीची ही जुनी साधने आणि त्यामागील कथा नेहरू विज्ञान केंद्रात पुन्हा समर्पित केल्या आहेत.
नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईने लॉकडाऊनच्या काळात पुनर्संचयित केलेले रेल्वे लोकोमोटिव्ह्जच्या वस्तू अभ्यागतांसाठी पुन्हा समर्पित केल्या आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच प्रमुख पाहुणे संजीव मित्तल यांनी आज, 26 जानेवारी 2021 रोजी भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एनएससी मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमात मौल्यवान वस्तू पुन्हा देशाला समर्पित केल्या.
नूतनीकरण केलेली आणि पुनर्संचयित वाफेवर चालणारी मालवाहू गाडी (स्टीम लॉरी), घोडा ट्राम कार, इलेक्ट्रिक ट्राम कार, एक अरुंद गेज स्टीम इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन आणि भारताचे स्वतःचे पहिले स्वदेशी डिझाइन आणि विकसित केलेले लढाऊ विमान 'मारुत' आता लोकांना बघण्यासाठी खुले असेल. या सर्व गोष्टी जवळून बघताना लोक इतिहासाचे साक्षीदार होतील.
"हा कार्यक्रम इतिहास, वारसा, विज्ञान आणि रेल्वे यांचे विस्मयकारक एकत्रिकरण आहे. आज देश 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच विज्ञानाचा मोठा संग्रह असणाऱ्या ठिकाणी रेल्वे वारसा समर्पित करण्यात आला," असे संजीव म्हणाले.
वाहतुकीमध्ये इंजिनाच्या महत्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भाष्य केले. "येथे उभे असलेले डीसी इलेक्ट्रिक लोको क्रमांक 20024NVCP2 हे इंजिन रेल्वेच्या समृद्ध वारशाचे प्रतिक आहे. हे इंजिन 1938 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्स्युलर रेल्वेने चालू केले आणि हे इंजिन कल्याण-पुणे विभागातील प्रवासी गाड्यांना जोडण्यात आले आणि 40 वर्ष हे इंजिन या मार्गावर धावत होते. यामध्ये मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या डेक्कन क्वीनला विशेष महत्व आहे.” डीसी इलेक्ट्रिक लोको क्रमांक 20024NVCP2 हा भारतीय उपखंडात इलेक्ट्रिक इंजिन सुरू झाल्यानंतर सेवेत रुजू झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनपैकी एक आहे असे त्यांनी नमूद केले.
संजीव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तयार केलेल्या संग्रहालयाबद्दलही सांगितले. “सीएसएमटी इमारत ही जागतिक वारसा आहे. या इमारतीच्या एका भागाचे, दुर्मिळ कलाकृती दर्शविणारे आणि रेल्वे इतिहासाची विस्तृत माहिती देणाऱ्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले आहे. सीएसएमटीच्या फलाट 18 मधील नवीन प्रवेशद्वाराजवळ जुने इंजिन व इतर वारसा वस्तू जतन करुन आणि नागरिकांना पाहण्यासाठी ठेवल्या आहेत.” असे संजीव मित्तल म्हणाले.
या शिल्पकृती जतन करण्यात नेहरू विज्ञान केंद्र आणि परेळ कार्यशाळेच्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. "1979 मध्ये हे इंजिन नेहरू विज्ञान केंद्राला देण्यात आले आणि जेव्हा या इंजिनाच्या जीर्णोद्धाराची गरज पडली तेव्हा परळ कार्यशाळेतील अधिकारी आणि तंत्रज्ञांचे समर्पित पथक पुन्हा कार्यान्वित झाले आणि या इंजिनाचे पूर्वीचे वैभव पुनर्संचयित केले." परळ कार्यशाळेच्या पथकाने नेहरू विज्ञान केंद्रातील अधिका-यांशी समन्वय साधून हे काम केले आणि केवळ तीन महिन्यांत जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण केले असे त्यांनी नमूद केले.
“परळ कार्यशाळेला वाफ, डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनपासून नुकत्याच झालेल्या लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) पर्यंत जवळपास 140 वर्षांचा उत्पादन व देखभाल यांचा मोठा इतिहास आहे,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, पुनसमर्पित रेल्वे इंजिन अभ्यागतांना रेल्वेच्या समृद्ध वारशाची माहिती देईल. विज्ञान, वारसा, इतिहास, यांत्रिकी, वाहतुकीचे ज्ञान प्रदान करून तरुणांना समृद्ध करण्याच्या नेहरू विज्ञान केंद्रातील कामांचे त्यांनी कौतुक केले आणि असे सांगितले की मध्य रेल्वे या अभियानाला पाठिंबा देईल.
या वेळी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक बी के दादाभॉय, मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता ए के गुप्ता, नेहरू विज्ञान केंद्राचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता ए के केवारी, श्रीप्रसाद केनेड उपस्थित होते.
* * *
S.Tupe/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692522)
Visitor Counter : 220