गृह मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत मेट्रो आणि अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे केलेले भूमिपूजन दोन्ही शहरातल्या जनतेसाठी महत्वाचा दिवस – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा

Posted On: 18 JAN 2021 6:59PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत मेट्रो आणि अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे केलेले भूमिपूजन दोन्ही शहरातल्या जनतेसाठी महत्वाचा दिवस असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे सुरत मेट्रो आणि अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्याच्या केलेल्या भूमिपूजन कार्यक्रमात अमित शहा सहभागी झाले.

या दोन्ही योजना गुजरातचा शहरी पायाभूत विकास  अधिक बळकट करतील असे शहा म्हणाले. या महत्वपूर्ण योजनांमुळे गुजरातचा विकासाचा प्रवास अधिक वेगाने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असताना नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाची कल्पना जनतेसमोर मांडली आणि आपल्या कार्यकाळातच ती साकारही केली असे शहा म्हणाले.

एखाद्या राज्याचा सर्वांगीण विकास कसा असावा याचा विचार नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे  मुख्यमंत्री या रूपाने केला होता. परिणामी गुजरातचा सर्वांगीण विकास झाला आणि मोदी जी यांनी संपूर्ण देशात राजदूताप्रमाणे  गुजरातचा विकास पोहोचवण्याचे कार्य केले. गेल्या साडेसहा वर्षातच देशात चांगले परिणाम दिसून येत असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. साडेसहा वर्षात रेल्वे क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडले आहे. यापूर्वी केवळ पाच शहरात सुमारे 250 किलोमीटर असलेली मेट्रो रेल्वे आज 18 शहरात 702 किमीपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689751) Visitor Counter : 70