वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

मिलेट्स अर्थात भरड धान्याच्या प्रसारासाठी अपेडा अर्थात कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात प्राधिकरणातर्फे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भरड धान्याचे निर्यातदार आणि शेतकरी उत्पादक संस्था यांची आभासी बैठक संपन्न

Posted On: 15 JAN 2021 9:13PM by PIB Mumbai

 

कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात प्राधिकरण (APEDA) आणि आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) या बाह्य निधीपुरवठ्यावरील आंध्र प्रदेश दुष्काळ निवारण योजना यांच्या सहयोगातून भरड धान्याच्या बाजारपेठेचे दुवे दृढ करण्यासाठी भरड धान्याचे निर्यातदार आणि  शेतकरी उत्पादक संस्था  यांची बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केली होती.

भरड धान्याच्या उत्पादनांना असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची वाढती निर्यात क्षमता लक्षात घेऊन   तसेच उच्च पोषणमुल्यांचा उत्तम स्रोत म्हणून पोषणयुक्त आहारात  मध्ये भरड धान्याचा वापर  वाढवण्याच्या दृष्टीने सरकार करत असलेले प्रयत्न, यामुळे कृषी अन्नप्रक्रिया निर्यात प्राधिकरण, भरड धान्यावर संशोधन करणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च तसेच राष्ट्रीय पोषण संस्था, CFTRI, कृषी उत्पादन संस्था अश्या सर्व संबंधितांबरोबर भरड धान्य तसेच त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पंच वार्षिक  योजनेवर काम करत आहे. या मंचामुळे निर्यातदार आणि शेतकरी उत्पादक संस्थाना उत्पादन घेणे आणि उत्पादनांचा पुरवठा या बद्दल एकमेकांशी संवाद साधता आला.

कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात संस्था हीचे व भरड धान्य उत्पादनांची निर्यात वाढवण्याच्या हेतूने पाच वर्षाची 2021-2026 साठी कृती योजना तयार करत आहे.  जेणेकरून लक्ष्य साधण्यासाठी सर्व संबंधितांना ठराविक कालमर्यादेत आवश्यक ती पावले उचलणे शक्य होईल.

याशिवाय सेंद्रिय भरड धान्य ओळखणे, शेतकरी उत्पादक  संस्था आणि  भरड धान्य निर्यातदार यांची  अपेडा अर्थात कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात प्राधिकरणाने विकसित केलेल्या कृषी कनेक्ट पोर्टलवर  नोंदणी  करून भरड धान्य निर्यातदारांना खरेदी-विक्रीसाठी परस्पर संवाद साधता येईल यासाठी या बैठकीत प्रयत्न  झाले . तसेच भारतीय भरड धान्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजार पेठेची चाचपणी करण्याविषयी  चर्चा झाली. .

भरड धान्याचा  अन्न म्हणून वापर करण्याबाबत वाढती जागरूकता विविध देशांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या उत्पादनात वाढ होऊन गेल्या काही वर्षात देशातील भरड धान्याच्या उत्पन्नात तसेच त्यांच्या निर्यातीत वाढ होताना दिसत आहे.

अपेडा चे अध्यक्ष डॉ एम अनगामुथ्थु, आंध्रप्रदेश राज्यसरकारचे कृषी विभागाचे सचिव श्री एच .अनुपकुमार , APDMPचे   मुख्य परिचालन अधिकारी जी . विनयीचंद  तसेच  अपेडा,  APDMP चे वरिष्ठ अधिकारी ताईच  कृषी उत्पादन संस्था चे सदस्य आणि मिलेट्स निर्यातदार या कार्यक्रमात सहभागी होते.

भरड धान्य ही छोट्या बीजांच्या तृणधान्यांसाठीची  संज्ञा आहे. ते पोषक जीवनसत्वांचा स्रोत मानले जातात.यामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी, राळे अशा तृणधान्यांचा समावेश होतो. भरड धान्य ही शेती उत्पादने असून सामान्यतः छोटी बिजे असताता आणि त्यांची पोषणमुल्ये उच्च असतात.

 

Jaydevi P.S/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1688928) Visitor Counter : 34


Read this release in: English , Urdu , Hindi