माहिती आणि प्रसारण मंत्रालय

एनएफएआयने विजया मुळे यांचा प्रचंड मोठा वैयक्तिक संग्रह मिळवला

Posted On: 15 JAN 2021 3:59PM by PIB Mumbai

 

प्रख्यात माहितीपट निर्मात्या  आणि चित्रपट इतिहासकार विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तके आणि चित्रपटांचा मोठा संग्रह आता भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग आहे. त्यांची मुलगी, प्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी मुळे  यांनी एनएफएआयला हा मौल्यवान संग्रह दान केला.  विजया मुळे भारतातील चित्रपट समाज चळवळीच्या प्रणेत्यांपैकी  एक होत्या  आणि माहितीपट तसेच शैक्षणिक माहितीसाठी त्या प्रसिद्ध होत्या.


 

त्यांच्या वैयक्तिक संग्रहात 200 हून अधिक पुस्तके, 16 मिमी स्वरूपात चित्रपट आणि मल्टिपल व्हीएचएस टेप आहेत. विविध भाषांमधील असंख्य पुस्तकांमध्ये भारतीय चित्रपट, प्रख्यात चित्रपट निर्माते, कल्पनारम्य आणि घटनांवर आधारित चित्रपट आणि जागतिक चित्रपटसृष्टी आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या  निर्मात्यांच्या चित्रपटांचा वैविध्यपूर्ण  समावेश आहे. त्यात  मासिके, जर्नल्स, चित्रपटांचा शब्दकोश आणि विविध चित्रपट महोत्सवांची माहितीपत्रके / अधिकृत कागदपत्रे देखील आहेत.
विजया मुळे  निर्मित किशन अँड हिज मॅजिक चॅरियट   ( 1980 ) या शैक्षणिक चित्रपटाची 16 एमएम प्रिंट संग्रहातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. जगाविषयी जाणून घेण्याच्या विद्यार्थ्यांमधील उत्सुकतेला वाव  देऊन  शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या मार्गांवर हा चित्रपट भाष्य करतो.
प्राप्त झालेल्या चित्रपटांतील अन्य शीर्षकांमध्ये द इंडियन टॉम्ब (1921) आहे ज्यांचे सहलेखन प्रख्यात चित्रपट निर्माते फ्रिट्ज लँग यांनी केले आहे, दुसरा  एक  फ्रेंच माहितीपट आहे लुईस माले यांचा कलकत्ता (1969) जो कान्स चित्रपट महोत्सवाचा भाग होता, आणि त्यानंतर आहे  मूव्हींग पिक्चर्स (2000)  कोलिन लॉ यांचा ज्यात  पाच दशकांहून अधिक काळात त्यांनी संग्रहित केलेल्या युद्ध प्रतिमांच्या वैयक्तिक संग्रहाचा  दृश्य शोध हा माहितीपट घेतो.


मुख्य म्हणजे व्हीएचएस मध्ये  एक टीव्ही मालिका आहे ज्याला 'जई फाईट उन बीओ वॉएज' . इटालियन चित्रपटसृष्टीतील  दिग्गज चित्रपट निर्माते रॉबर्टो रोसेलिनी यांचा तीन भागांचा कार्यक्रम आहे , ज्याचे नाव 'हेरेक्स क्यूइ कोम रोजेली' आहे, जो 11 जानेवारी ते 6 ऑगस्ट  1959 दरम्यान  प्रसारित केला गेला.
यात सुहासिनी मुळे,  तपन बोस आणि सलीम शेख दिग्दर्शित ‘भोपाळ: बियॉंड जेनोसाईड ’ (1986)' हा माहितीपट  आहे. भोपाळमधील कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात  3 डिसेंबर 1984 च्या रात्री विषारी वायू गळतीनंतर झालेल्या  दुखद घटनेचे  वेदनादायक चित्रण हा माहितीपट उलगडतो.
हा भव्य संग्रह स्वीकारताना आम्हाला आनंद झाला. आम्ही सुहासिनी मुळे यांचे आभारी आहोत. त्यांनी  एनएफएआयवर विश्वास दाखवून हे सर्व साहित्य जतन करण्यासाठी दान केले.  मला खात्री आहे की हा संग्रह जगभरातील चित्रपट संशोधकांना उपयुक्त ठरेल. आम्ही सर्वाना आवाहन करतो की एनएफएआयकडे आर्काइव्ह फिल्मशी संबंधित साहित्य जमा करा,  जेणेकरून ती भावी पिढ्यांसाठी जतन करुन ठेवता येईल आणि चित्रपट संशोधकांना ते सहज उपलब्ध होईल.  ”असे एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688808) Visitor Counter : 96


Read this release in: English