विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
रशियन विज्ञान संस्था-पीओआय एफईबी आणि सीएसआयआर-एनआयओ/एनजीआरआय यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
13 JAN 2021 4:26PM by PIB Mumbai
पणजी, 13 जानेवारी 2021
रशियातील व्ही.आय. इलीश्चेव्ह पैसिफिक सागरी अभ्यास संस्था- POI, आणि भारतातील गोव्यातली राष्ट्रीय सागरी अध्ययन संस्था CSIR-NIO, तसेच हैदराबाद येथील राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्था- CSIR-NGRI यांच्यात सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
पीओआय (POI) ही रशियाच्या पूर्व भागातील सर्वात मोठी संशोधन संस्था असून या संस्थेअंतर्गत 31 विविध अत्याधुनिक उपरकरणे असलेली संशोधन केंद्रे आहेत. भारतातील CSIR-NIO आणि CSIR-NGRI या संशोधन आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या अद्ययावत संशोधन प्रयोगशाळा असून अनुक्रमे सागरी विज्ञान आणि पृथ्वी विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी त्या जगभरात ओळखल्या जातात.
12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या दोन्ही संस्थांमध्ये आभासी पद्धतीने या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. POI FEB चे संचालक डॉ याशेस्लाव्ह लोबानोव्ह आणि CSIR गोवाचे संचालक प्रा सुनील कुमार सिंग तसेच हैदराबादच्या CSIR चे संचालक डॉ वीरेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी दोनही देशातले राजनैतिक अधिकारी आणि रशियाचे राजदूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
या सामंजस्य करारामुळे भारतीय आणि रशियन शास्त्रज्ञांना सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्षमता आणि कौशल्ये यांची देवघेव करता येणार आहे. दोन्ही देशांच्या शाश्वत विकासासाठी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासातील अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करता येऊ शकेल. विशेषतः भू-स्त्रोत, भौगोलिक क्षेत्रातील अवकाषीय विविधता, सागरी भू-विज्ञान, पलिओजिओग्राफी, पर्यावरण आणि हवामान बदल, भौगोलिक आणि जीवशास्त्रीय सागरी अध्ययान, हायड्रोकेमेस्ट्री अशा विविध क्षेत्रात सहकार्य आणि भर देत एकत्र काम करता येणार आहे.
या सामंजस्य करारामुळे सागरी प्रदूषण आणि हवामान बदल अशा समस्यांचा एकत्रित सामना करता येईल. सागरी स्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त वैज्ञानिक अध्ययन शिबिरे आणि इतर उपक्रम राबवता येतील.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688267)
Visitor Counter : 176