संरक्षण मंत्रालय
पुण्यातील एआरडीई आणि भारतफोर्ज येथे लष्कर प्रमुखांनी दिली भेट : आत्मनिर्भरतेच्या दिशेने लष्कराचे कार्य
Posted On:
09 JAN 2021 7:13PM by PIB Mumbai
भारतीय लष्कराच्या अत्याधुनिकीकरणासाठी पुण्यातील भारत फोर्ज आणि एआरडीई यांचे संशोधन आणि विकास क्षेत्रातील प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी आज भेट दिली. यावेळी लष्कर प्रमुखांना संरक्षणविषयक सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी, अल्ट्रा लाइट हॉविझर्स, संरक्षित वाहने, लहान शस्त्रे आणि दारूगोळा आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.
लष्कर प्रमुखांनी कल्याणी सेंटर ऑफ टेक्निकल अँड मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशनलाही भेट दिली. तेथे त्यांना थ्रीडी प्रिंटिंग, मानवरहित ग्राउंड व्हेइकल्स, नॅनो टेक्नॉलॉजी, एआय, थर्मल इमेजिंग इत्यादींची माहिती देण्यात आली.
आरमामेंंट रीसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टेबलिशमेन्ट (एआरडीई ) ही संरक्षण संशोधन विकास संघटनेची प्रमुख संस्था असून सैन्य दलाला जागतिक स्तरावरील शस्त्रास्त्र यंत्रणेचा पुरवठा करण्याचे काम करते. एआरडीईच्या भेटीदरम्यान लष्करप्रमुखांना एआरडीईने विकसित केलेल्या उपकरणे व दारूगोळा यांच्या प्रयोगात घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांवरील संशोधन व प्रगती आणि नवीन उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये एटीएजीएस, पिनाका, 10 मीटर फोल्डेबल ब्रिज, लेझर गाईड अँटी-टँक गाईडेड मिसाईल सिस्टम यांचा समावेश होता.
जनरल एम.एम. नरवणे यांची ही भेट केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने सशस्त्र सैन्याने स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
M.Iyengar/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687339)
Visitor Counter : 125