दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
31 डिसेंबर रोजी मुंबई येथे पेन्शन अदालतचे आयोजन
Posted On:
24 DEC 2020 3:56PM by PIB Mumbai
मुंबई, 24 डिसेंबर 2020
पेंशन आणि पेंशनभोगी कल्याण विभाग आणि डाक निदेशालयाचे पेंशन विभागाचे पत्र संख्या 100-01/ 2019- पीईएन, दिनांक 10-11-2020 आणि 17-12-2020 मधे दिल्या गेलेल्या दिशानिर्देशानुसार प्रत्येक मंत्रालय / विभाग / संगठन / क्षेत्रीय यूनिट द्वारे देशभर पेंशन अदालत आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे शुक्रवार 31 डिसेंबर 2020 ला 11 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, दूसरा माळा, जीपीओ भवन, मुंबई–400 001 येथे डाक विभागाच्या निवृत्तिवेतनधारक / परिवार निवृत्तिवेतनधारकांसाठी डाक पेंशन अदालतचे आयोजन केले जाईल.
निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रात आपल्या तक्रारी वरिष्ठ लेखा अधिकारी, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, दूसरा माळा, जीपीओ भवन, मुंबई–400 001 यांना 28 डिसेंबर 2020ला किंवा त्या आधी पाठवू शकतात । 28 डिसेंबर 2020, नंतर प्राप्त झालेल्या पत्रांचा पेंशन अदालत मधे विचार केला जाणार नाही.
डाक पेंशन अदालतच्या अर्जासाठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683318)
Visitor Counter : 102