कृषी मंत्रालय
गोव्यातील ‘आयसीएआर-केव्हीके’मध्ये शेतकरी दिवस साजरा
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2020 10:06PM by PIB Mumbai

‘आयसीएआर-केव्हीके’मध्ये आज शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. आयसीएआरचे संचालक डॉ. ई.बी. चाकूरकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. शेतकरी बांधवांनी कृषी उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमामध्ये कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधीत व्यवसायांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल पाच शेतक-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतक-यांना कंपोस्ट खते तयार करण्यासाठी आवश्यक असलेले ‘व्हर्मिबेडस’ (कृमी) देण्यात आले. तांत्रिक सत्रामध्ये कृषी विधेयक, व्हर्मिकंपोस्टिंग, पिकांचा हंगाम झाल्यानंतरचे आलेल्या पिकाचे व्यवस्थापन, कुक्कुटपालन आणि पोषाहाराचे व्यवस्थापन याविषयी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे 40 शेतकरी उपस्थित होते.

.jpeg)
देशाचे दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीदिनी म्हणजे 23 डिसेंबर रोजी सर्वत्र राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरणसिंग हे शेतक-यांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी देशातल्या शेतकरी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक धोरणे आणि योजना तयार केल्या होत्या.


***
S.Thakur/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1683183)
आगंतुक पटल : 129
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English