कृषी मंत्रालय
धान खरेदीत गतवर्षीच्या तुलनेत 23.22% ने वाढ
सुमारे 48.28 लाख शेतकऱ्यांना खरिप विपणन हंगाम खरेदीचा लाभ
Posted On:
19 DEC 2020 9:17PM by PIB Mumbai
सरकार खरीप विपणन हंगाम 2020-21, मध्ये गेल्या हंगामानुसार अस्तित्वात असलेल्या किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी करीत आहे.
खरीप विपणन हंगाम 2020-21 मधील धान (तांदूळ) खरेदी, तांदूळ उत्पादक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरळीत सुरू आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये 18.12.2020 पर्यंत 411.05 लाख मेट्रीक टन धान खरेदी झाले. गतवर्षीपेक्षा यावर्षी धान खरेदीत 23.22% नी वाढ झाली.
सुमारे 48.28 लाख शेतकऱ्यांना याआधीच चालू खरीप विपणन हंगामातील किमान हमीभावावरील एकूण 77608.01 कोटी रुपयांच्या खरेदीचा लाभ झाला आहे.
याशिवाय, राज्यांकडून मिळालेल्या प्रस्तावाच्या आधारे मूल्य समर्थन योजनेंतर्गत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा,राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम 2020 च्या 51.00 लाख मेट्रिक टन डाळी व तेलबिया मूल्य समर्थन योजनेंतर्गत खरेदीला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये 1.23 लाख मेट्रीक टन खोबरे (बारमाही पीक) खरेदीला मंजूरी देण्यात आली आहे. राज्यांकडून मिळालेल्या प्रस्तावाच्या आधारे मूल्य समर्थन योजनेंतर्गत इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून मूल्य समर्थन योजनेंतर्गत अंतर्गत डाळी, तेलबिया आणि खोबरे खरेदीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मान्यताही देण्यात येईल.
18.12.2020 पर्यंत सरकारने आपल्या नोडल एजन्सीमार्फत मूग, उडीद, भुईमूग शेंगा आणि सोयाबिनची 191669.08 मेट्रीक टन 1027.76 कोटी रुपये एमएसपी मूल्याची खरेदी केली असून तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमधील 105987 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.
पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये किमान आधारभूत किंमतीने कापूस खरेदी सुरळीत सुरू आहे. 18.12.2020 पर्यंत 16799.87 कोटी रुपये किंमतीच्या 5761122 कापसाच्या गासड्या खरेदी झाल्या असून त्याचा लाभ 1120868 शेतकऱ्यांना झाला.
****
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682066)
Visitor Counter : 126