माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसार भारतीच्या सीईओंची आशिया-पॅसिफीक ब्रॉडकास्टींग युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड
Posted On:
16 DEC 2020 9:32PM by PIB Mumbai
प्रसार भारतीने प्रसारणासंबंधी आज आणखी एक जागतिक पातळीवरील मैलाचा टप्पा गाठला. मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांची ब्रॉडकास्टींग असोसिएशन युनियन या जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्था महासंघाच्या म्हणजे आशिया-पॅसिफीक प्रसारण संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. युनियनची महासभा आज कोविड 19मुळे आभासी पध्दतीने पार पडली, त्यात सदर निवडणूक झाली. शशी वेम्पती यांची निवड तत्काळ प्रभावाने तीन वर्षांसाठी झाली आहे.
I congratulate Prasar Bharti CEO Mr Shashi Shekhar Vempati, for winning the election for the post of Vice President of Asia Pacific Broadcasting Union.
Thanks to all the ABU members who voted in India's favour.@shashidigital
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) December 16, 2020
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निवडीबद्दल वेम्पती यांचे अभिनंदन केले आणि भारताच्या बाजुने मतदान करणाऱ्या एबीयु सभासदांचे आभार मानले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आशिया पॅसिफिक विभागातील सदस्य देशांच्या जवळपास सर्व सार्वजनिक प्रसारण संस्थांनी भारताच्या सार्वजनिक प्रसारकाच्या उमेदवारीसाठी एनएचके जपानने ठेवलेल्या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले. चीनच्या एनआरटीएचे उमेदवारीसाठीचे नामांकन अयशस्वी ठरले, कोणत्याही सभासदांकडून त्याला पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे प्रसार भारतीच्या सीईओंचा उपाध्यक्षपदासाठी निवडीचा मार्ग मोकळा झाला.
आशिया पॅसिफीक प्रसारक युनियनची स्थापना 1964 मध्ये प्रसारण संस्थांची व्यावसायिक संघटना म्हणून झाली, ज्याचे 57 देश आणि प्रांतातील 286 सदस्य आहेत. या प्रसारण संस्थांचे कार्यक्रम सुमारे तीन अब्ज लोकांपर्यंत पोहचतात.
****
G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681284)
Visitor Counter : 207