दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल खात्याकडून 17 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
Posted On:
16 DEC 2020 7:46PM by PIB Mumbai
टपाल खात्याच्या सेवेसंबंधीच्या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी टपाल खाते नियमितपणे डाक अदालतीचे आयोजन करते. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्याकडून 17 डिसेंबर 2020 रोजी मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई-400001 यांच्या कार्यालयामध्ये 113 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/मनी ऑर्डर/बचत बँक खाते/प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
RT/SRT/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681224)
अभ्यागत कक्ष : 89