केंद्रीय लोकसेवा आयोग

एकत्रित संरक्षण सेवा लेखी परीक्षा (II) -2020 चा निकाल

Posted On: 16 DEC 2020 7:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने  दिनांक 08 नोव्हेंबर 2020 रोजी घेतलेल्या   एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा( II) -2020च्या निकालानुसार खालील क्रमांकाचे 6727 उमेदवार सेवा निवड मंडळापुढे होणाऱ्या मुलाखतींसाठी पात्र ठरले आहेत.संरक्षण मंत्रालयाच्या  मंडळाच्या  (i) इंडियन मिलिटरी अँकेडेमीचा डेहराडून येथील जुलै 2021पासून सुरू होणारा 151 वा (DE)अभ्यासक्रम (ii) जुलै 2021पासून सुरू होणारा ईझिमाला केरळ येथील  इंडियन नेव्हल अँकेडेमीचा अभ्यासक्रम (iii) हैद्राबाद इथे सुरू होणारा एअर फोर्स अँकेडेमीचा (प्री फ्लाईंग) जुलै 2021पासून सुरू होणारा अभ्यासक्रम (210 F(P)) (iv) आँक्टोबर 2021 पासून सुरू होणारा  चेन्नई येथील 114 वा SSC(men) (NT)अधिकारी प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम  (v) आँक्टोबर 2021 पासून सुरू होणारा  चेन्नई येथील 28 वा SSC महिला (Non technical) (UPSC)अधिकारी प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम.

या  सर्व अभ्यासक्रमांसाठी लेखी परिक्षेनंतर मुलाखती होणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांची ही यादी तात्पुरती आहे. परीक्षेतील प्रवेशाच्या अटींनुसार त्यांना वय(जन्मतारीख),शैक्षणिक पात्रता,एनसीसी (सी)(लष्कर शाखा ,वायू शाखा वरीष्ठ विभाग,नौदल विंग)यांच्याकडे जर पहिली पसंती शाॉर्ट सर्व्हिस कमिशन असेल तर पुरुष उमेदवारांनी सीडीएसई कडे, आणि महिला उमेदवारांनी  एसएससी महिला आयएचक्यू ऑफ एमओडी  आर्मी/भरती संचालनालय, वेस्ट ब्लॉक III आर के पूरम, नवी दिल्ली -110066 इथे, आणि जर नौदल ही पहिली पसंती असेल तर आयएचक्यू ऑफ एम ओडी (नेव्ही) जर  पहिली पसंती असेल तर आयएचक्यू ऑफ एमओडी डीएमपीआर( OI&R section) रूम नंबर 204,सी विंग, सेना भवन,नवी दिल्ली 110011, जर वायू दल पहिली पसंती असेल तर PO3(A)  एअर हेड क्वार्टरजे ब्लॉक, रुम नंबर 17, वायू भवनासमोर,मोतीलाल नेहरू मार्ग नवीदिल्ली 110001येथे या उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. जे उमेदवार ही प्रमाणपत्रे वेळेवर उपलब्ध करणार नाहीत त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल. मूळ प्रमाणपत्रे 1 जुलै 2020 लष्कर भरतीसाठी वायूसेनेसाठी 13मे 2021 आणि शाँर्ट सर्व्हिस कमिशनसाठी आँक्टोबर 2021या तारखांपर्यंतच सादर करता येतील. उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र पाठवून देऊ नयेत.

जे उमेदवार लेखी  परीक्षेत उत्तीर्ण असतील आणि त्यांनी लष्कर (IMA/OTA)ला आपली पहिली पसंती दिली असेल त्यांनी स्वतः ला भरती संचालनालय www.joinindianarmy.nic.in  यावर एसएसबीच्या मुलाखतीसाठीच्या कॉलसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

जर उमेदवारांनी दिलेला पत्ता बदलला असेल तर त्यांनी लष्कर मुख्यालय /नौदल मुख्यालय/वायू मुख्यालय जे असेल त्याप्रमाणे त्वरीत थेटपणे कळवावे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आवारात परीक्षा सभागृहाच्या इमारतीजवळ यासाठी एक सुविधा केंद्र उघडले आहे. परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती/स्पष्टीकरण हवे असल्यास सकाळी10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वैयक्तिक रीत्या अथवा No.011-23385271, 011-23381125 , 011-23098543 दूरध्वनीवरून संपर्क साधू शकतात. उमेदवार http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर देखील निकालासंदर्भात माहिती मिळवू शकतात.

जे उमेदवार उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांच्या गुणपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर अंतिम निकालानंतर OTA वर (एसएसबी मुलाखतींनंतर)15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर केल्या जातील,आणि 30 दिवसांसाठी उपलब्ध रहातील.

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681188) Visitor Counter : 140