युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नेहरु युवा केंद्र, पणजी यांच्याकडून एक भारत श्रेष्ठ भारतवर वेबिनारचे आयोजन
Posted On:
16 DEC 2020 6:22PM by PIB Mumbai
नेहरु युवा केंद्र, पणजी यांनी गोवा आणि जोडराज्य झारखंड यांच्यादरम्यान भाषाशिक्षण या विषयावरील वेबिनारचे आज आयोजन केले होते. वेबिनारसाठी गोवा विद्यालय ताळगाव येथील कोंकणी भाषेचे विभागप्रमुख हनुमंत चोपडेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. आपल्या देशातील विविधतेतील एकता आणि तिचे संवर्धन करणे, नागरिकांमध्ये अस्तित्वात असलेल्या भावनिक बंधांना आणखी दृढ करणे यावर वेबिनारमध्ये भर देण्यात आला.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाची पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140 व्या जयंतीप्रसंगी 31 ऑक्टोबर 2015 रोजी घोषणा केली होती. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संस्कृती, परंपरा आणि पद्धतींचे ज्ञान एकमेकांना समजेल आणि दोन्ही राज्यांमध्ये सामंजस्य आणि स्नेह वृद्धिंगत होईल. परिणामी भारताची एकता आणि अखंडता बळकट होईल. वेबिनारचे संचालन पणजीचे जिल्हा युवक समन्वयक नितीश मन्राल यांनी केले.
***
G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681155)
Visitor Counter : 84