दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपालखात्यातील निवृतांच्या समस्या सोडवण्यासाठी पेन्शन अदालत
Posted On:
11 DEC 2020 2:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020
टपालखात्यातील निवृतांच्या समस्या समाधानकारकरित्या सोडवण्याच्या दृष्टीने गोवा टपाल विभागाची (यांमध्ये गोवा राज्य,महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे समाविष्ट आहेत.) पेन्शन अदालत 31.12.2020 रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा विभाग, पणजी-403 001 येथे भरत आहे.
टपाल खात्यातून निवृत्त झालेले वा टपाल खात्याच्या सेवेत असताना मृत्यू पावलेल्या पात्र निवृत्ती वेतनधारकांच्या पश्चात निवृत्तीवेतन घेणाऱ्यांच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीपश्चात लाभ यासंबधीच्या तक्रारी/समस्या आणि निवृत्तीवेतन तीन महिन्यात मार्गी लागले नसेल त्यांना पेन्शन अदालतमध्ये यासंबधी तड लावता येईल. पेन्शन अदालतीत CAT/Court केंद्रीय प्रशासकीय लवाद तसेच न्यायालयीन प्रकरणं या सारख्या निव्वळ न्यायालयीन बाबी समाविष्ट असलेल्या केसेस, वारसा विवाद आणि धोरणात्मक बाबींसंबधित तक्रारींची दाद मागता येणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी अर्ज खालील पत्त्यावर 20.12.2020 पर्यंत पाठवावेत
श्री शिवकुमार वर्मा, वरिष्ठ अकाउंटस अधिकारी पेन्शन अदालत, O/o पोस्टमास्टर जनरल गोवा विभाग, पणजी-403001.
20.12.2020 नंतर मिळालेल्या अर्जांचा नियोजित पेन्शन अदालतीसाठी विचार केला जाणार नाही.
Jaydevi P.S/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680020)
Visitor Counter : 276