दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

गोवा टपाल विभागाच्यावतीने ख्रिसमससाठी लेटअस एन्जॉय अ कोविड-19 फ्री ख्रिसमस 2020’’ या घोषवाक्यासह विशेष शिक्का जारी

Posted On: 11 DEC 2020 4:00PM by PIB Mumbai

गोवा, 11 डिसेंबर 2020

गोवा टपाल विभागाच्या पणजी टपाल कार्यालयाचे  वरिष्ठ अधीक्षक सुधीर जाखरे यांच्या हस्ते आज, दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी ‘‘लेटअस एन्जॉय अ कोविड-19 फ्री ख्रिसमस 2020’’ या घोषवाक्यासह विशेष शिक्का जारी करण्यात आला. यावेळी पणजी प्रादेशिक कार्यालयाचे  टपाल सेवा सहाय्यक संचालक के बालाराजू, गोवा फिलाटेलिक आणि न्यूमिसमेटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम.आर. रमेशकुमार, गोव्यातले सर्व टपाल खात्यातले अधिकारी उपस्थित होते. पणजी येथे टपाल भवनातल्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष शिक्क्यावर ख्रिसमस सण साजरा करतानाही कोविड योग्य वर्तन करणे म्हणजे मास्क वापरण्यात यावा, सामाजिक अंतर कायम ठेवावे, वारंवार हात धुवावेत, याचा संदेश छापण्यात आला आहे.

गोवा विभागातल्या पणजीचे मुख्य टपाल कार्यालय आणि मडगाव टपाल कार्यालय यांच्याकडे दि. 11 ते 24 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये बटवड्यासाठी येणा-या प्रत्येक पाकिटांवर आणि इतर लिफाफ्यांवर, पत्रांवर तसेच वस्तूंवरही या विशेष कोविड -19 सुरक्षा शिक्क्याचा ठप्पा उठविण्यात येणार आहे. ख्रिसमस उत्सवाच्या काळामध्ये कोविड-19 विषयी अधिक दक्षता घेऊन संरक्षण करण्यासाठी जनजागृती वाढविण्याच्या दृष्टीने या विशेष शिक्क्याचा वापर करण्यात येणार आहे.

 

Jaydevi P.S/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679998) Visitor Counter : 118


Read this release in: English