युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

भारताच्या ‘फिटनेस का डोज, आधा घंटा रोज’  मोहिमेचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक; विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही मोहिमेला पाठींबा

Posted On: 10 DEC 2020 9:07PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या फिटनेस का डोस, आधा घंटा रोजमोहीमेचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. “‘फिटनेस का डोस, आधा घंटा रोजया मोहिमेच्या माध्यमातून शारीरिक व्यायामाला प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेचे जागतिक आरोग्य संघटना स्वागत करत आहे.असे संघटनेच्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते, एक डिसेंबर रोजीदेशव्यापी फिट इंडिया अभियानाचा भाग म्हणून ही मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेला, सिनेसृष्टी, खेळाडू, लेखक, डॉक्टर्स, व्यायाम प्रशिक्षक यांच्यासह इतर अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांचा भरघोस पाठींबा मिळत आहे. या सर्वांनी देशवासियांना दररोज अर्धा तास व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक बॅडमिंटन खेळाडू, ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू ने यांनी ट्वीट केले आहे की, “फिटनेस हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे, ही मोहीम म्हणजे सर्वांना  निरोगी आयुष्यासाठी एकत्र येण्याची संधी आहे."

लेखक चेतन भगत यांनीही, ‘आयुष्य सुदृढ राहण्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता, मानसिक स्थिती, आरोग्य आणि एकूण निरामयता यांचा महत्वाचा प्रभाव पडत असतोअशी प्रतिक्रिया दिली आहे.

जीवनशैली आणि निरामय आयुष्य जगण्याचे तंत्र शिकवणारे तज्ञ ल्युक कुतिन्हो यांनीही, “केवळ 30 मिनिटे व्यायाम करुन तुम्ही संपूर्ण दिवसभर आपले शारीरिक आरोग्य राखू शकताअसे म्हणत पंतप्रधान मोदी आणि रीजीजू यांच्या या मोहिमेचे कौतुक केले आहे.

ISSF जागतिक चषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती नेमबाज, अपूर्वी चंदेला यांनीही ट्वीट करुन हा मोहिमेला पाठींबा दिला आहे. त्याशिवाय कुस्तीपटू सुशील कुमार, नेमबाज गगन नारंग, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, अ‍ॅथलीट दीपा मलिक,धावपटू  हिमा दास, मानिका बात्रा, अभिनेते अनिल कपूर, क्रिकेटपटू मिताली राज अशा सर्वांनी या मोहिमेला पाठींबा दिला आहे.

 

.@WHO applauds India’s 🇮🇳 initiative on promoting physical activity. Learn more about @WHO’s recommendations on physical activity. pic.twitter.com/kmHcAJFpat

— WHO South-East Asia (@WHOSEARO) December 6, 2020

 

*******

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679824) Visitor Counter : 197