संरक्षण मंत्रालय

आर्मी सर्विस कोअर विभागाचा 260 वा स्थापना दिन साजरा

Posted On: 08 DEC 2020 9:11PM by PIB Mumbai

पुणे, 8 डिसेंबर 2020

 

आर्मी सर्विस कॉर्प्स या भारतीय लष्करातील सर्वात अनुभवी आणि सर्वात मोठ्या प्रशासकीय विभागाचा 260 वा स्थापना दिवस 8 डिसेंबर 2020 रोजी साजरा करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात स्थापन झालेल्या आणि त्या वेळी छोट्या प्रमाणात कार्यरत असलेल्या या विभागाने त्याच्या कार्याचा विस्तार वाढवत नेला आणि आता हा विभाग भूमी, जल आणि हवाई अशा तिन्ही आघाड्यांवर उत्तम कार्य करीत आहे.

कोरड्या वाळवंटापासून ते बर्फाच्छादित पर्वत, जंगले आणि अति-उच्च ठिकाणी अशा सर्व प्रकारच्या भूप्रदेशांमध्ये तसेच उपखंडात लढणाऱ्या लष्करी दलांसाठी हा विभाग सशक्त पाठबळ देणारा ठरला आहे.

आर्मी सर्विस कोअरमधील धाडसी जवानांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 568 सन्मान मिळविले होते तर स्वातंत्र्य मिळविल्यानंतर या विभागातील जवानांनी  एक महा वीर चक्र, 14 वीर चक्रे,4 कीर्ती चक्रे, एक अशोक चक्र, 21 शौर्य चक्रे आणि 134 सेना पदके मिळविण्याचा पराक्रम केला आहे. या विभागाने नेहमीच पात्र क्रीडापटूंना विविध क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले आहे आणि अभिमानास्पद कामगिरी करत आर्मी सर्विस कोअरमधील खेळाडूंमधून 4 अर्जुन पुरस्कार विजेते, 3 हॉकी ऑलिम्पिकपटू यांसह अतिधाडसी ‘टोर्नाडो’ मोटारसायकल पथक आणि तिरंदाजी, मुष्टियुद्ध,जलतरण आणि घोडेस्वारी या खेळांमधील प्राविण्यप्राप्त खेळाडू नावारूपाला आले.

या विभागाच्या 260व्या स्थापना दिनानिमित्त, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक,विशिष्ट सेवा पदक यांनी सन्मानित आणि  जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ सदर्न कमांड लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी आर्मी सर्विस कोअरच्या सर्व श्रेणींमधील जवानांचे त्यांच्या कर्तव्याप्रतीचे निस्वार्थी समर्पण आणि एकनिष्ठा यासाठी कौतुक केले आहे.

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679213) Visitor Counter : 124


Read this release in: English