अर्थ मंत्रालय
बनावट व्यवहाराचे 290.70 कोटी रुपयांचे रॅकेट नागपूर डीजीजीआय कडून उध्वस्त
एम अँन्ड एम एडव्हायझर अँन्ड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाला अटक
25.22 कोटी रुपयाच्या इनपुट टॅक्स क्रेडिटची रोखीने वसुली
Posted On:
07 DEC 2020 6:50PM by PIB Mumbai
बनावट आयटीसी पास करून त्याचा लाभ घेणाऱ्या अस्तित्वात नसलेल्या धुळे इथल्या जाहिरात कंपनीच्या तपासासंदर्भात मुंबई स्थित एम अँन्ड एम एडव्हायझर अँन्ड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडच्या इमारतीवर आणि कंपनीच्या संचालक आणि सनदी लेखापालाच्या घरी छापा घालण्यात आला. प्रसारण हक्क आणि चित्रपट दाखवण्यासाठी परवानाप्राप्त सेवा देण्यासाठी या कंपनीने नोंदणी केली होती.
यावेळी सापडलेल्या कागद पत्रावरून, चित्रपट निर्मिती हाउससाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर प्रसारणासाठी चित्रपट हक्क परवाना देण्यात कंपनी गुंतली असल्याचे समोर आले आहे. मोठ्या निर्मिती संस्थांनी निर्माण केलेल्या चित्रपटांसाठी आपली कंपनी एकमेव हक्क धारक असल्याचे त्यांनी म्हटले होते.नामांकित बॅनरनी निर्मिती केलेल्या चित्रपटांचे हक्क कंपनी खरेदी करून हे हक्क करार पद्धती अंतर्गत राईटस असायनरकडे हस्तांतरित करत असे आणि ते इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेत असत.
या कंपनीने 290.70 कोटी रुपयांचे बनावट व्यवहार केले असून अंतिम लाभार्थी असलेल्या राईटस असायनरकडे 25.22 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट पास केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
कंपनीने पास केलेले संपूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिटचे 25,22,62,786 रुपये राईटस असायनरने तपासादरम्यान रोखीत दिले.
कंपनीचे संचालक प्रदीप अशोक मालणकर आणखी तीन कंपन्यांचे संचालक असल्याचे आढळून आले असून 5 डिसेंबर 2020 ला त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने 18 डिसेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
S.Tupe/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678882)
Visitor Counter : 96