ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत किंमतीनुसार झालेले खरेदी व्यवहार
सुमारे 32.92 लाख धान शेतकऱ्यांना खरीप विपणन हंगामातील खरेदीमुळे किमान हमीभावानुसार 63563.79 कोटी रुपये किंमतीचा झाला लाभ
Posted On:
06 DEC 2020 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2020
सध्या सुरू असलेल्या 2020-21 सालच्या खरीप विपणन हंगामात सरकार सध्याच्या किमान आधारभूत किंमतीनुसार खरीप हंगाम 2020-21 मध्ये शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत आहे.
खरीप 2020-21 च्या हंगामात पंजाब, हरीयाणा, उत्तरप्रदेश, तेलगंणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, ओदिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्ये/केंद्रशासित प्रदेशात ही खरेदी सुरळीतपणे चालू असून आतापर्यंत 336.67 लाख मेट्रिक टन धान्याची खरेदी 05.12.2020 पर्यंत झाली असून, गतवर्षीच्या 279.91लाख मेट्रिक टन खरेदीच्या तुलनेत ती 20.27% अधिक आहे. एकूण 336.67 लाख मेट्रिक टन खरेदी पैकी फक्त पंजाब राज्यातून 202.77 लाख मेट्रिक टन इतकी खरेदी 30.11.2020 पर्यंत म्हणजे त्या राज्यातील हंगाम संपेपर्यंत झाली, जी देशातील एकूण खरेदीच्या 60.23% आहे.

सुमारे 32.92 लाख शेतकऱ्यांना खरीप विपणन हंगामातील खरेदीमुळे किमान हमीभावानुसार 63563.79 कोटी रुपये किंमतीचा लाभ झाला आहे.

तसेच राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरीयाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम 2020 साठी 45.24 लाख मेट्रीक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी पीएसएसनुसार मान्यता देण्यात आली आहे. तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि केरळ या राज्यांना 1.23 लाख मेट्रीक टन सुक्या खोबऱ्याच्या (बारमाही पीक)खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. केंद्रातील मध्यवर्ती एजन्सीने जाहीर केलेल्या अथवा राज्य सरकारने नामनिर्देशित केलेल्या खरेदीच्या दरापेक्षा बाजारपेठेतील किंमती कमी झाल्यास एफएक्यूग्रेडच्या पीकांची खरेदी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून डाळी, तेलबिया आणि सुके खोबरे यासाठी प्रस्ताव आल्यानंतर अन्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पीएसएसनुसार खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात येईल.
05.12.2020 पर्यंत सरकारने नोडल संस्थांमार्फत 130619.34 मेट्रीक टन इतकी मूग, उडीद, भुईमूगाच्या शेंगा आणि सोयाबीनची खरेदी केली आहे, ज्याची किमान आधारभूत किंमत 702.21कोटी रुपये आहे आणि ज्यामुळे तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि राजस्थान येथील 74613 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
त्याचप्रमाणे गतवर्षीच्या 293.34 मेट्रीक टन तुलनेत यंदाच्या हंगामात 05.12.2020 पर्यंत किमान हमीभावानुसार 52.40 कोटी रुपयांचे 5,089 मेट्रीक टन सुके खोबरे( बारमाही पीक) खरेदी करण्यात आले, ज्याचा लाभ कर्नाटक आणि तामिळनाडू येथील 3961 शेतकऱ्यांना झाला. सुके खोबरे आणि उडीद यांच्या संदर्भात त्यांचे दर बहुतेक मोठ्या उत्पादक राज्यांत एमएसपीपेक्षा अधिक असतात. खरीप डाळी आणि तेलबियांची आवक जशी होईल त्यानुसार संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशात त्याप्रमाणे त्यांच्या खरेदीसाठी आवश्यक व्यवस्था करत आहे.

पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओदिशा आणि कर्नाटक या राज्यांत किमान आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे. 05.12.2020 पर्यंत 11084.78 कोटी रुपयांच्या 3832259 कापसाच्या गासड्यांची खरेदी झाली ज्याचा लाभ 750779 शेतकऱ्यांना झाला.

* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678753)