माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटाचे प्रदर्शन
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2020 4:36PM by PIB Mumbai
मुंबई, 5 डिसेंबर 2020
भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, उद्या म्हणजे 6 डिसेंबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘फिल्म डिव्हिजन’ च्या वतीने त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जीवनचरित्रावरील माहितीपट, ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’चे प्रदर्शन केले जाणार आहे. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, फिल्म्स डिव्हिजनच्या ‘या आठवड्यातील माहितीपट’ विभागाअंतर्गत, https://filmsdivision.org/ या वेबसाईट वर किंवा https://www.youtube.com/FilmsDivision यु-ट्यूब चॅनेलवर उद्या मध्यरात्रीपर्यंत बघता येईल.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील हा माहितीपट, देशातील महान कायदेतज्ञ, अर्थतज्ञ आणि समाजसुधारक यांच्या जीवनकार्याचा आणि विशेषतः समाजातल्या वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या सेवाकार्याचा विस्तृत आणि वेधक परिचय करून देणारा आहे. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अतुल्य योगदानाची माहितीही आपल्याला या चित्रपटातून होते.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1678581)
आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English