ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदी
Posted On:
28 NOV 2020 11:20PM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगाम (KMS) 2020-21, मध्ये सरकार गेल्या हंगामाप्रमाणेच शेतकऱ्यांकडून 2020-21 वर्षातील खरीप पिकांची खरेदी सध्या अस्तित्वात असलेल्या आधारभूत किंमत योजनांनुसार करत आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदिगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश ओदिशा आणि महाराष्ट्र या धान उत्पादक राज्ये व केंद्रशासिक प्रदेशात खरीप विपणन हंगाम 2020-21 मधील धान खरेदी व्यवहार सुरळीत सुरू आहेत. या राज्यांमध्ये 27.11.2020 पर्यंत 313.25 लाख मेट्रिक टन धान खरेदी झाले. गेल्या वर्षी याच काळापर्यंत 264.32 लाख मेट्रिक टन धान खरेदी झाले होते. यंदा धान खरेदीमध्ये 18.51टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकूण 313.25 लाख मेट्रिक टन धान खरेदीपैकी एकट्या पंजाबमध्ये 202.70 लाख मेट्रिक टन धान खरेदी झाले आहे. हे प्रमाण एकूण धान खरेदीच्या 64.71 टक्के आहे.

किमान आधारभूत किंमतीवर झालेल्या एकूण 59142.08 कोटी रुपयांच्या खरेदीचा लाभ 28.95 लाख शेतकऱ्यांना झाला आहे.

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार, केंद्र सरकारने तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राज्यस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांना 2020च्या हंगामात, 45.24 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची मूल्य समर्थन योजनेनुसार (PSS) योजनेनुसार खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि केरळ या राज्यांतून 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे (बारमाही पीक) खरेदीसही मंजुरी देण्यात आली आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जर डाळी, तेलबिया आणि खोबरे यांच्या मूल्य समर्थन योजनेनुसार खरेदीचे प्रस्ताव पाठवले तर ते त्वरीत मान्य करण्यात येतील.
या पिकांच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी थेट नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून 2020-21 च्या आधिसूचीत किमान आधारभूत मुल्यांनुसार नियोजित हंगामात करण्यात येईल. जर या पिकांचे बाजारभाव हे किमान आधारभूत मुल्यानुसारच्या किंमतीपेक्षा कमी झाले तर राज्यांनी निर्धारित केलेल्या संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय नोडल संस्थांमार्फत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या पिकांची खरेदी करण्यात येईल.
27.11.2020 पर्यंत नोडल संस्थांमार्फत सरकारने 95,318.50 मेट्रीक टन मूग, उडीद, भूईमूग शेंगा आणि सोयाबीनची 513.62 कोटी रूपयांची खरेदी केली असून त्याचा तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा व राजस्थानमधील 54,891 शेतकऱ्यांना लाभ झाला.

27.11.2020 पर्यंत कर्नाटक आणि तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीनुसार 52.40 कोटी रुपयांचे 5,089 मेट्रीक टन खोबरे (बारमाही पीक) खरेदी केले याचा 3,961 शेतकऱ्यांना लाभ झाला.सध्या खोबरे आणि उडीद यांचा भाव यांचे उत्पादन घेणाऱ्या राज्यात किमान आधारभूत किंमतीच्या तुलनेत अधिक आहे.

किमान आधारभूत किमतीवर आधारित कपास पिकाची खरेदी पंजाब, हरयाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सुरू आहे.27.11.2020 पर्यंत 27,62,824 कापसाच्या गासड्याची 8127.83 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. याचा लाभ 5,56,081 शेतकऱ्यांना झाला.
***
Jaydevi PS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676897)
अभ्यागत कक्ष : 139