संरक्षण मंत्रालय
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, कमांडर-इन-चिफ, अंदमान अँड निकोबार कमांड अँड कर्नल कमांडन्ट, दि बॉम्बे सॅपर्स यांची बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटरला भेट
Posted On:
26 NOV 2020 9:59PM by PIB Mumbai
पुणे, 26 नोव्हेंबर 2020
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, कमांडर-इन-चिफ, अंदमान अँड निकोबार कमांड अँड कर्नल कमांडन्ट, दि बॉम्बे सॅपर्स यांनी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर आणि, खडकी येथे 23 ते 25 नोव्हेंबर 2020 या काळात भेट दिली. जून 2020 मध्ये कर्नल कमान्डन्ट हे पद धारण केल्यानंतर बॉम्बे सॅपर्स येथे त्यांची ही पहिलीच भेट होती.
पायोनियर मेमोरिअल (स्मारक) येथे पुष्पहार अर्पण करून भेटीला प्रारंभ झाला आणि गार्ड ऑफ ऑनरची मानवंदना स्वीकारली. प्रशिक्षणाचा दर्जा उच्च राखला गेल्याबाबत त्यांनी सैनिक संमेलनादरम्यान, त्यांच्या भाषणात कौतुक केले. पूर परिस्थितीच्या काळात झालेल्या मदतकार्याचे आणि कोविड – 19 महामारीच्या काळात आलेल्या आव्हानांवर यशस्वीपणे मात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कृतीशीलतेच्या तत्परतेचा उच्च दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सर्व श्रेणींना प्रोत्साहन दिले, त्याचबरोबर स्थानिक समाजाशी जोडलेले राहून राष्ट्र उभारणीसाठी प्रभावी योगदान द्यावे, असे सांगितले.
कर्नल कमान्डन्ट यांनी नव्याने भरती होणाऱ्या आणि तरूण सैनिकांना लढाईच्या दृष्टीकोनातून तसेच तांत्रिकदृष्ट्या दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची पाहणी केली आणि पायाभूत प्रशिक्षण सुविधांमधील सुधारणा सुचविल्या. जनरल ऑफिसर यांनी भेट देऊन बॉम्बे सॅपर्सच्या उत्कृष्ट खेळाडूंचे विशेष कौतुक केले, ज्यांनी नौकायन, मुष्ठियुद्ध, नौकाविहार आणि ट्रायथलॉन यामध्ये विजयाचा बहुमान मिळविला आहे. कमांडर-इन-चिफ यांनी लेफन्टंट जनरल सीपी मोहन्ती, अति विशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चिफ, दक्षिण मुख्यालय यांच्याशी संवाद साधला. युद्धाच्या काळात, त्रि – सेना ऑपरेशन्समध्ये संयुक्तता आणि ताळमेळ साधण्याच्या संबंधित विषयांवर चर्चा केली.
.......
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676686)
Visitor Counter : 100