माहिती आणि प्रसारण मंत्रालय
71 व्या संविधान दिनी फिल्म्स डिव्हिजन भारतीय संविधानावरील चित्रपट दाखवणार
Posted On:
25 NOV 2020 9:26PM by PIB Mumbai
उद्या (26 नोव्हेंबर, 2020) 71 वा संविधान दिन साजरा करण्यासाठी फिल्म्स डिव्हिजन केंद्र सरकारने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेले भारतीय संविधान, त्याची ठळक वैशिष्ट्ये आणि संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष,डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्यावरचे चार माहितीपट फिल्म्स डिव्हिजनचे संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनेलवर दाखवणार आहे.
भारतीय संविधानाच्या विविध कलमांचे वर्णन करणारा 'अवर कॉन्स्टिट्यूशन (12 मि. / इंग्रजी / 1950 )', , वी द पीपल ऑफ इंडिया (21 मि. / इंग्रजी /1986) ज्यात संविधानाचा आराखडा तयार होत असतानाचे वर्णन आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेवरील ऍनिमेशनपट ''द प्रीऍम्बल ''(5 मि ./ इंग्लिश / 1973) आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. बी.आर.आंबेडकर यांच्यावरील ''बाबासाहेब आंबेडकर ''( 75 मि./इंग्रजी/1991) आत्मचरित्रपर माहितीपट दाखवले जाणार आहेत.
26 नोव्हेंबर 2020 रोजी www.filmsdivision.org/DocamentaryoftheWeek आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision वर 24 तास हे माहितीपट प्रसारित केले जातील.
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675870)
Visitor Counter : 170