अर्थ मंत्रालय
बनावट पावतीवर 4.86 कोटी रुपयांच्या खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणात नामांकित बांधकाम व्यावसायिकाला अटक
Posted On:
19 NOV 2020 4:38PM by PIB Mumbai
मुंबई/नागपूर, 19 नोव्हेंबर 2020
बनावट पावत्यावर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासंदर्भात सुरू असलेल्या तपासात डीजीजीआय, नाशिक प्रादेशिक विभाग, डीजीजीआय, नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या नामांकित बांधकाम व्यावसायिकाला अटक केली.
हा व्यावसायिक अस्तित्त्वात नसलेल्या कंपनीने जारी केलेल्या बनावट पावत्यांवर खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट घेत आहे आणि या बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी करत आहे अशी माहिती डीजीजीआयला मिळाली होती .
या व्यावसायिकाने ओळख पटू नये यासाठी आपली पूर्वीची नोंदणी रद्द केली होती आणि वेगळ्या व्यवस्थापनाअंतर्गत नवीन नोंदणी केली होती. मात्र, ऑनलाइन डेटा मायनींग टूल्सच्या मदतीने रद्द केलेल्या नोंदणीची संपूर्ण माहिती मिळवण्यात आली आणि खोटे इनपुट क्रेडिट घेतल्याचे छाप्यांदरम्यान आढळून आले.
पश्चिम बंगालमधील अस्तित्वात नसलेल्या आणि कोणतीही वस्तू किंवा सेवा पुरवली नाही अशा काही कंपन्यांनी जारी केलेल्या इनव्हॉईसच्या आधारे या बांधकाम व्यावसायिकाने 4.86 कोटी रुपयांच्या फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला आहे. जेव्हा वस्तुस्थिती मांडण्यात आली तेव्हा चौकशी दरम्यान हे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याची कबुली त्याने दिली.
त्यानंतर अतिरिक्त महासंचालक, डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिट यांनी जारी केलेल्या अटक-वॊरंटच्या आधारे या बांधकाम व्यावसायिकाला, डीजीजीआय, नाशिक प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. बांधकाम व्यावसायिकाने आत्तापर्यंत 25 लाख रुपये दिले आहेत आणि ही संपूर्ण रक्कम लवकरच जमा होईल.
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674029)
Visitor Counter : 179