संरक्षण मंत्रालय

ऑस्ट्रेलियाच्या नौदलाची युद्धनौका ‘एच एम ए एस बल्लारत’ गोव्याच्या भेटीवर

प्रविष्टि तिथि: 11 NOV 2020 10:13PM by PIB Mumbai

गोवा,  11 नोव्हेंबर 2020

ऑस्ट्रेलियाच्या नौदलाची  'एच एम ए एस बल्लारत' ही  युद्धनौका  काल 10 नोव्हेंबर 20 रोजी गोव्याच्या मोरमुगाव बंदरात दाखल झाली. गोवा नौदल क्षेत्र मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांच्या संरक्षण सल्लागारांनी या जहाजाचे स्वागत केले.

बंगालच्या उपसागरात मलबार चार देशांच्या युद्ध  सराव  मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर 'एच एम ए एस बल्लारत', या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात अरबी समुद्रातल्या दुसऱ्या सरावात सहभागी होत आहे. गोव्याहून ही युद्धनौका दि. 13 नोव्हेंबर 20 रोजी निघणार असून, विमानवाहू नौकेबरोबर पहिल्यांदाच करण्याच्या सरावाबद्दल या जहाजावरील खलाशी व नौसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

Jaydevi.P.S/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1672107) आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English