माहिती आणि प्रसारण मंत्रालय
फिल्मस डिव्हिजनच्यावतीने चरित्रपटाच्या माध्यमातून सी.व्ही. रामण यांना आदरांजली
प्रविष्टि तिथि:
06 NOV 2020 7:40PM by PIB Mumbai
मुंबई, 6 नोव्हेंबर, 2020
विज्ञान क्षेत्रामध्ये आपल्या अफाट कर्तृत्वाने आणि संशोधनाने अमिट ठसा उमटविणारे नोबेल पुरस्कार विजेते भारतीय भौतिक शास्त्रज्ञ, भारत रत्न सी.व्ही. रामण यांची आज 132 वी जयंती आहे. यानिमित्त फिल्मस डिव्हिजनच्यावतीने सी.व्ही. रामण यांच्यावर तयार करण्यात आलेल्या चरित्रपटाचे प्रदर्शन फिल्मस डिव्हिजनच्या यू-टयूब वाहिनीवर आणि संकेतस्थळावर आज करण्यात आले. इंग्रजी भाषेतील चरित्रपट 18 मिनिटांचा आहे.

या चरित्रपटामध्ये प्राध्यापक रमण यांचे जीवनकार्य, भौतिक शास्त्रामध्ये त्यांनी केलेल्या ‘रामण इफेक्ट’ या संशोधनाला मिळालेली मान्यता, याशिवाय त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. या माहितीपटाचे ‘सप्ताहातील माहितीपट‘ म्हणून 7 नोव्हेंबर 2020 रोजी https://filmsdivision.org/ आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळांवर प्रसारण करण्यात येणार आहे. 24 तासांसाठी हा चरित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1670758)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English