अर्थ मंत्रालय
एलआयसी गोवा विभागाने पहिल्या वर्षाच्या प्रीमियममध्ये पहिला क्रमांक पटकावला
Posted On:
04 NOV 2020 10:21PM by PIB Mumbai
गोवा, 4 नोव्हेंबर 2020
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), गोवा विभागाने पहिल्या वर्षाच्या हप्त्याच्या (प्रीमियम) उत्पन्नामध्ये 60.28% ची सकारात्मक वाढ नोंदवली आहे. आणि 31 ऑक्टोबर 2020 रोजी एलआयसीच्या देशभरातील सर्व 112 विभागांमध्ये पहिला क्रमांक तर सिंगल प्रीमियम वाढीच्या दरात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
एलआयसीवर विश्वास दाखवल्याबद्दल आणि महामारीच्या कालावधीतही एलआयसी महामंडळाला आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल गोव्यातील सर्व विमाधारकांचे आम्ही अभिनंदन करतो. नागरिकांनी इतर बचतींपेक्षा विम्याला प्राधान्य दिले आणि परताव्याची हमी देणाऱ्या पेन्शन योजना, आरोग्य विमा, युलिप आणि इतर पारंपारिक योजनांमध्ये अधिक रस दाखवला.
जनतेमध्ये विमा जागरूकतेला चालना देण्यासाठी एलआयसीच्या पश्चिम विभागाचे प्रमुख विकास राव यांनी कुटुंबाच्या गरजेनुसार कुटुंबातील सदस्यांना विमा छत्र पुरवण्यासाठी आणि त्या कुटुंबाला सन्मानाने बीमा परिवार म्हणून घोषित करण्यासाठी हमारा परिवार, एलआयसी बीमा परिवार हे अभियान सुरू केले. या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून आम्ही आमच्या वितरण वाहिन्यांद्वारे सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहोत. या मोहिमेमुळे मिशन वन मिलियन (एमओएम) यशस्वी होईल आणि आम्ही या दिवाळीत दहा लाख घरांमध्ये आयुर्विम्याचा दिवा पेटवू.
आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने गोव्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना आम्ही प्रत्येक कुटुंब एलआयसी बीमा परिवार बनेल अशी अपेक्षा करतो.
व्यवसायातील विक्रमी वाढीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल गोवा विभागाचे सर्व विकास अधिकारी, सीएलआयए, एजंट्स, आमचे इन्शुरन्स चॅनेल पार्टनर, अधिकारी व कर्मचारी सदस्य यांचे आम्ही अभिनंदन करतो.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670339)
Visitor Counter : 124