पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

इंडियन ऑइलने देशभरासाठी सामान्य इंडेन रीफिल बुकिंग क्रमांक सुरू केला


ग्राहकांना नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी पुढाकार

Posted On: 29 OCT 2020 8:17PM by PIB Mumbai

 

मुंबई, 29 ऑक्टोबर 2020

 

इंडियन ऑईलने ग्राहकांच्या सोयीसाठी देशभरातील इंडेन एलपीजी रिफिल नोंदणीसाठी एक सामायिक क्रमांक सुरू केला आहे. संपूर्ण देशासाठी एलपीजी रिफिलसाठी सामायिक नोंदणी क्रमांक 7718955555 हा आहे. ग्राहकांसाठी 24x7 ही सुविधा उपलब्ध आहे.

एसएमएस व आयव्हीआरएसद्वारे - देशभरात  एलपीजी रिफिल बुकिंगसाठी सामायिक क्रमांक ग्राहकांच्या सोयीसाठी आणि इंडेन एलपीजी रिफिल बुकिंग सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आता ग्राहक एका दूरसंचार परिमंडळातून दुसऱ्या परिमंडळात गेला तरी त्यांचा इंडेन रीफिल बुकिंग क्रमांक कायम राहील.

इंडेन एलपीजी रिफिल बुकिंगसाठी सध्याची दूरसंचार परिमंडळ विशिष्ट दूरध्वनी क्रमांकाची सध्याची व्यवस्था 31.10.2020 च्या मध्यरात्रीनंतर बंद केली जाईल आणि एलपीजी रिफिल साठी 7718955555 हा सामायिक क्रमांक लागू होईल.

विशेष म्हणजे, केवळ ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करून इंडेन एलपीजी बुकिंग करता येते. एलपीजी रिफिल बुकिंग व मोबाइल क्रमांक नोंदणीची सुधारित प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

जर ग्राहकाचा नंबर आधीपासूनच इंडेन नोंदीमध्ये नोंदणीकृत असेल तर आयव्हीआरएस 16-अंकी कस्टमर आयडी सूचित करेल. कृपया लक्षात घ्या की या 16-अंकी कस्टमर  आयडीचा उल्लेख ग्राहकांच्या इंडेन एलपीजी पावत्या / कॅश  मेमोज / सदस्यता व्हाउचरवर दिलेला आहे. ग्राहकाकडून  पुष्टीनंतर रिफिल बुकिंग स्वीकारले जाईल.

जर इंडेन रेकॉर्डमध्ये ग्राहकाचा मोबाईल नंबर उपलब्ध नसेल तर ग्राहकांनी 7 सह प्रारंभ होणारा 16-अंकी कस्टमर आयडी  टाकून मोबाईल क्रमांकाची एकदा  नोंदणी केली पाहिजे. त्यानंतर त्याच आयव्हीआरएस कॉलमध्ये प्रमाणीकरण केले जाईल.  पुष्टी झाल्यावर, ग्राहकाचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत होईल आणि एलपीजी रिफिल बुकिंग स्वीकारले जाईल. ग्राहकांच्या या 16-अंकी कस्टमर  आयडीचा उल्लेख इंडेन एलपीजी इनव्हॉइस/कॅश मेमो/सबस्क्रिप्शन व्हाउचरवर आहे.

https://cx.indianoil.in  या संकेतस्थळावर लॉग इन करा किंवा इंडेन एलपीजीबाबत अद्ययावत माहितीसाठी इंडियनऑयल वन (IndianOil ONE) मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा.

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668613) Visitor Counter : 401


Read this release in: English