माहिती आणि प्रसारण मंत्रालय
फिल्म्स डिव्हिजनने भारतीय शास्त्रीय नृत्याचा सन्मान करणाऱ्या- नृत्यांजलीचा शेवटचा भाग सादर केला
Posted On:
27 OCT 2020 11:04PM by PIB Mumbai
मुंबई, 27 ऑक्टोबर 2020
प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्य कलाकारांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित माहितीपटांचा ऑनलाइन उत्सव, नृत्यांजलीच्या पहिल्या भागाला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, फिल्म्स डिव्हिजन या महोत्सवाचा शेवटचा भाग सादर करीत आहे. काही प्राचीन आणि लोकप्रिय शास्त्रीय नृत्यांच्या शैली, ती कला आणि त्यातील बारकावे या विषयावर विशिष्टपणे संशोधन केलेले माहितीपट फिल्म्स डिव्हिजनच्या वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर 28 ते 30 ऑक्टोबर 2020 दरम्यान प्रदर्शित केले जातील.
नृत्यांजली - भाग 2 ची सुरूवात ओम नमः शिवाय (27 मिनिटे / 1981 / लोकसेन लालवाणी) च्या प्रदर्शनासह झाली. हा चित्रपट नृत्याची देवी आणि हिमालयातील कन्या पार्वतीबद्दल आहे आणि पृथ्वीवर नृत्य घडवून आणणार्या शिव-नटराजांच्या नृत्यासंदर्भात आहे. उत्तरेकडील हिमालय ते दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत नृत्याची विविध रूपे भारतात आढळतात. भटकंती करत असताना, ती तिच्या भक्तीद्वारे मूर्तिकारलेल्या कल्पित गोष्टींशी संवाद साधते आणि पवित्र भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रूपात देवतांना प्रार्थना करते.
कथकली - (22 मिनिटे/1959/ मोहन वाधवानी) - यामध्ये केरळमधल्या अव्दितीय शास्त्रीय नृत्यनाट्याचे प्रारंभीच्या काळातील वर्णन करण्यात आले आहे. कथकली शिकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे स्वयंशिस्त असावी लागते. या माहितीपटामध्ये हा प्राचीन, पारंपरिक नृत्यप्रकार विद्यार्थ्यांना आणि कार्यक्रमाचे सादरीकरण करणा-या कलाकारांना कशा पद्धतीने शिकवला जात होता. त्यातील विविध पात्रे कशी रंगवून सादर केली जातात, हे दर्शविण्यात आले आहे.
ओडिसी नृत्य - (21 मिनिटे/1972/ घनश्याम महापात्रा) - ‘ओडिसी’ या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यावर आधारित हा माहितीपट आहे. ओडिशामध्ये अनेक शतकांपासून हे नृत्य केले जाते. आता या नृत्यप्रकाराला देशामध्ये आणि परदेशामध्येही सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे.
कुचीपुडी नृत्य: प्राचीन आणि आधुनिक (भाग-1) (21 मिनिटे/1973/ टी.ए. अब्राहम) आणि (भाग-2) (16 मिनिटे) - या माहितीपटाच्या पहिल्या भागामध्ये कुचीपुडी नृत्याची परंपरा, लोकप्रियता यांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तर दुस-या भागामध्ये ‘भामा कलापम’ ही भगवान कृष्णाला आदरांजली अर्पण करणारी नृत्यनाटिका सादर केली आहे.
द थिंकिंग बॉडी- (81 मिनिटे/2016/ कादंबरी शिवाय )- या माहितीपटामध्ये नृत्याच्या शारीरिक स्थितीविषयी चित्रण करण्यात आले आहे. नृत्य ही एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शारीरिक अस्तित्वाच्या पुढची भावावस्था निर्माण करणारी कला आहे. त्यामुळे अशा भावावस्थेमध्ये गेलेला नृत्यकलाकार वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तीनही कालखंडामध्ये मनाने प्रवास करू शकतो. नृत्याच्या भूमिकांमध्ये गूढ मनाच्या खोल राज्यात कलाकार सहजतेने प्रवेश करतो. कलाकार वैचारिक पातळीवरून मनाने अध्यात्मिक स्तरावर पोहोचू शकतो. विविध भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार अनेक प्रकारच्या भावनांच्या आणि रसांच्या माध्यमातून संवाद साधण्याचे अतिशय उत्तम आणि परिपूर्ण साधन आहे, याचा उहापोह या माहितीपटामध्ये करण्यात आला आहे.
कथक -(22 मिनिटे/1970/ एस. सुखदेव - शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि मूळ भारताचा असलेला हा नृत्यप्रकार आहे. याची उत्पत्ती प्राचीन उत्तर भारतातल्या भटक्या समाजात झाली, असे नमूद करण्यात आले आहे. मुळात कथाकार किंवा कथेकरी म्हणजेच गोष्ट सांगणारी व्यक्ती. या नृत्यप्रकारामध्ये गोष्ट सांगण्याला महत्व आहे. मंदिरामध्ये एक विधी नृत्य आणि भक्तीची चळवळ रूजविणारा हा नृत्यप्रकार असल्याचे पुरावे आजही पहायला मिळतात. 16 व्या शतकापासून सुरू झालेल्या कथक नृत्य प्रकारामध्ये पर्शियन नृत्य आणि मध्य अशियाई नृत्याची वैशिष्टये दिसून येतात. तसेच मुघलांच्या काळामध्ये शाही दरबारांमध्ये हे नृत्य केले जात होते. या माहितीपटामध्ये कथक नृत्याचा इतिहास दाखविण्यात आला आहे.
हे माहितीपट, 28 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत www.filmsdivision.org/ आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision येथे पाहता येतील.
M.Chopade/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668009)
Visitor Counter : 196