संरक्षण मंत्रालय

74 वा पायदळ दिन साजरा

प्रविष्टि तिथि: 27 OCT 2020 8:29PM by PIB Mumbai

पुणे, 27 ऑक्टोबर 2020

पायदळाच्या तुकडीनं बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे स्मरण म्हणून 27 ऑक्टोबर हा दिवस पायदळ दिन म्हणून साजरा केला जातो.  27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय लष्काराने पहिल्यांदाच पाकिस्तानची कश्मिरमधून हकालपट्टी करण्यासाठी श्रीनगर विमानतळावर  पाऊल ठेवले होते. त्या दिवसाचे स्मरण म्हणून पायदळ दिवस साजरा केला जातो.

पायदळ दिन उत्सवाचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे देशाच्या सेवेत रणांगणांवर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांचा सन्मान करण्यासाठी ‘पुष्पांजली’ समारंभ आयोजित करण्यात आला होता. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे आणि कमांडर्स तसेच कर्नल यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन मेघदूत ब्रिगेडियरचे तीन दिग्गज उमेशसिंग बावा, वीर चक्र (सेवानिवृत्त), सुभेदार (मानद कॅप्टन) संसारचंद, महावीर चक्र (सेवानिवृत्त) आणि नाईक जय राम सिंह, वीर चक्र (सेवानिवृत्त) यांनीही पुष्पहार अर्पण केले.

या दिवशी सर्व इन्फंट्रीमॅनना दिलेल्या संदेशात इन्फंट्री महासंचालकांनी, त्यांना शौर्य, त्याग, कर्तव्या प्रति निस्वार्थ समर्पण आणि देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या निर्धारात दुर्दम्य इच्छाशक्ती राखण्यासाठी प्रोत्साहन दिले.

 

M.Chopade/S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1667976) आगंतुक पटल : 307
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English