शिक्षण मंत्रालय

एनआयटी वारंगलच्या 18 व्या दीक्षांत समारंभात शिक्षणमंत्र्यांचे आभासी स्वरुपात भाषण

Posted On: 22 OCT 2020 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2020


केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते आज, वारंगल इथल्या एनआयटी परिसरात बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन झाले. तसेच, याच परिसरात असलेल्या रुद्रम्मा देवी महिला वसतिगृहाच्या  इमारतीचा कोनशिला समारंभ देखील त्यांच्या हस्ते झाला.

एनआयटी वारंगल च्या 18 दीक्षांत समारंभात देखील पोखरीयाल यांनी आभासी स्वरूपात भाषण केले. यावेळी त्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या, पंडित मदन मोहन मालवीय अध्यापन-अध्ययन केंद्र, विश्वेश्वरय्या कौशल्य विकास केंद्र, सरदार वल्लभभाई पटेल अतिथीगृह या तीन इमारतींचे उद्घाटन केले.  इन्फोसिस चे संस्थापक पद्मभूषण एन आर नारायणमूर्ती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. एनआयटी चे संचालक डॉ एनव्ही रामन राव, देखील यावेळी उपस्थित होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर, हा दीक्षांत समारंभ मोशन कॅप च्या रीएलीटी आभासी तंत्रज्ञानाच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलतांना पोखरीयाल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जे शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले असते, त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग करण्याची सुरुवात या दीक्षांत समारंभापासून होते, त्यामुळे हा सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा असतो. असे पोखरियाल म्हणाले. आता विद्यार्थी खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्यास तयार झाले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

NIRF  क्रमवारीत 26 व्या स्थानापासून 19 व्या स्थानापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी एनआयटी चे अभिनंदन केले. शिक्षण क्षेत्र, देश आणि समाजाच्या प्रगतीत ही  संस्था मोठे योगदान देऊ शकते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेरचा विचार करावा आणि जगात जिथे अंधार आहे तिथे प्रकाश उजळवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला त्यांनी दिला.

नोकरी, संशोधन, आणि उद्योग आणि  शैक्षणिक क्षेत्रातील तफावत कमी करण्यात, एनआयटीचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666901) Visitor Counter : 124


Read this release in: English