संरक्षण मंत्रालय

दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा

Posted On: 19 OCT 2020 8:33PM by PIB Mumbai

पुणे, 19 ऑक्‍टोबर 2020


दक्षिणी  कमांड, पुणे “भारतीय लष्कर : विविधतेतील एकतेचे प्रतीक” या संकल्पनेसह खुली ऑनलाइन स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा विविध वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. विजेत्यांना एकूण 1,22,000/- रुपये (एक लाख बावीस हजार रुपये) पारितोषिक रक्कम आणि भारतीय लष्कराकडून गुणवत्ता  प्रमाणपत्र दिले जाईल.

या स्पर्धेचे तपशील दक्षिणी कमांडच्या फेसबुक पेज “SouthernCommand.IndianArmy” आणि ट्विटर हँडल “IaSouthern” वरही अपलोड केले  आहेत.

विविध वयोगटासाठी या स्पर्धेमध्ये चार स्पर्धांचा समावेश आहे- म्हणजे घोषवाक्य  लेखन, व्हिडिओ मेकिंग, छायाचित्रण आणि चित्रकला. व्हिडीओ, छायाचित्रे, चित्रकला, आणि घोषवाक्य दक्षिणी कमांडच्या फेसबुक पेजवर संदेश म्हणून अपलोड करावे लागतील किंवा स्पर्धकाचा मोबाइल क्रमांक  आणि  आधार कार्ड / वयाचा पुरावा प्रतीसह  sconlinecomp[at]gmail[dot]com या ईमेल आयडीवर पाठवावे लागेल.

पुण्याचे दक्षिणी मुख्यालय यांच्याकडुन सांगण्यात आले की, ऑनलाईन स्पर्धेचे उद्दीष्ट आपल्या देशात उपलब्ध असणारी प्रतिभा जोपासणे हे आहे . लोकांनी या ऑनलाईन स्पर्धेत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 19 ऑक्टोबर  2020 पासून प्रवेशिका खुल्या आहेत आणि 10 डिसेंबर  2020 ही प्रवेशिका पाठवण्याची शेवटची तारीख आहे.  स्पर्धेचा निकाल 16  डिसेंबर 2020 रोजी विजय दिनाच्या निमित्ताने दक्षिण कमांड फेसबुक व ट्विटर हँडलवर जाहीर करण्यात येईल.

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665921) Visitor Counter : 94


Read this release in: English