संरक्षण मंत्रालय

दहशतवादी कारवायांविरोधात लष्कर आणि पोलिस यांचा 'सुरक्षा कवच' हा संयुक्त सराव


Posted On: 13 OCT 2020 5:27PM by PIB Mumbai

पुणे, 13 ऑक्टोबर 2020

भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस या दोहोंसाठी संयुक्त सरावाचे आयोजन लष्कराच्या अग्नीबाज विभागाने नुकतेच (9 ऑक्टोबर 2020 रोजी) लुल्लानगर, पुणे येथे केले होते.  पुणे येथील एखादी संभाव्य दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी दहशतवादविरोधी तात्काळ कृती दले (QRTs)  कार्यान्वित करताना सैन्यदल आणि पोलिस या दोहोंमध्ये   समन्वय असावा हा या सरावाचा उद्देश होता. 

या सरावात तात्काळ कृती दले, डॉग स्क्वॅड्स आणि सैन्यदलाचे बॉंम्ब निकामी करणारे पथक तसेच दहशतवादविरोधी पथक (ATS) तसेच महाराष्ट्र पोलिसांचे तात्काळ कृती पथक सहभागी झाले होते. लुल्लानगर येथे एका निवासस्थानी दहशतवादी असल्याच्या नकली परिस्थितीवर सिम्युलेटेड सराव  आखलेला होता, त्यानुसार सैन्यदलाच्या तात्काळ कृती दलाने सर्वात बाहेरील वेढा रचला. आसपासच्या वाहतूकीची व्यवस्था महाराष्ट्र वाहतूक पोलिस व लष्करी पोलिस दलाने संयुक्तपणे हाताळली. त्यानंतरची दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्याची संयुक्त कारवाई ही लष्कराच्या दहशतवादविरोधी पथकाने (CTTF)  व महाराष्ट्र पोलिसांच्या तात्काळ कृती दलाने मिळून  केली. यामध्ये जागेत प्रवेश करणे (room intervention drill), डॉग स्वाडच्या सहाय्याने जागेतील स्फोटकांचा शोध घेणे, आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाद्वारे ती स्फोटके निकामी करणे या बाबींचा समावेश सरावात होता. याकामासाठी वापरण्यात येणाऱ्या महत्वाच्या वस्तू प्रदर्शित केल्या होत्या. कोविड-19 पासून सुरक्षिततेसाठीचे निकष पाळून त्यानुसार सहभागी दलांचे नियोजन करण्यात आले होते.

सैन्य दल तसेच पोलिस या दोघांनाही  प्रक्रियेदरम्यान सहकार्य, समन्वय, सामिलीकरण, आणि ड्रील व प्रक्रियेचे एक सुसूत्रीकरण याचा अनुभव घेता आला. आणि दोहोंसाठीही तो एक अनोखा अनुभव होता.

 

M.Iyengar/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664035) Visitor Counter : 115


Read this release in: English