वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आभासी पध्दतीने होणार उद्या पहिल्या इंडिया आंतरराष्ट्रीय ज्वेलरी शोचे उद्घाटन
Posted On:
11 OCT 2020 7:27PM by PIB Mumbai
पहिला व्हर्चुअल इंडिया आंतरराष्ट्रीय ज्वेलरी शो उद्या सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता होईल. भारतीय रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) आंतरराष्ट्रीय ज्वेलरी शोचे आयोजन केले आहे. सुमारे 350+ प्रदर्शक शोमध्ये नोंदणीकृत 10000+ पेक्षा जास्त अभ्यागतांना त्यांच्या खास दागिन्यांचा संग्रह प्रदर्शित करतील.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी 9.30 वाजता सुरू होणार्या उद्घाटन समारंभाला संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी, पुढील लिंकवर कृपया लॉग इन करा: https://gjepc.org/iijs-virtual/
उद्घाटन सोहळा आयआयजेएसच्या सभागृहात आभासी स्वरूपात आयोजित केला जाईल.
माध्यमांसाठी नोंदणीकरिता कृपया संपर्क साधा:
पूनम, जीजेईपीसी - 9987753828, अभिषेक, अॅडफॅक्टर्स पीआर, : 9664516774.
****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663569)
Visitor Counter : 111