माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय बालिका दिन -2020 निमित्त अॅनिमेशन आणि डॉक्युमेंटरी चित्रपटांचे स्क्रीनिंग
Posted On:
10 OCT 2020 5:31PM by PIB Mumbai
मुंबई, 10 ऑक्टोबर 2020
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त फिल्म्स विभाग 11 ऑक्टोबर,2020 रोजी निवडक अॅनिमेशन आणि माहितीपट दाखवणार आहे. www.filmsdivision.org आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision वर या चित्रपटांचे प्रसारण केले जाईल.
विशेष पॅकेजमध्ये चिमुकली - मुलगी वाचवा (3 मि.) हा मुलगी वाचवा आणि स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्यावर आधारित अॅनिमेशन चित्रपट समाविष्ट आहे. त्यानंतर एज्युकेशन -ओन्ली हर फ्युचर (5 मि.), प्रतिभा (20 मि.), कुलदीपक (60 मि.) माय फेअरी -माय स्ट्रेंथ (39 मि.) आणि रोशनी (58 मि) हे माहितीपट दाखवले जातील.

दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय बालिका दिनी , युनिसेफ मुलींचा आवाज वाढवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी उभे राहण्यासाठी मुलींबरोबर वार्षिक मोहीम राबवतो. यावर्षीची संकल्पना “माझा आवाज, आमचे समान भविष्य” , पौगंडावस्थेतील मुलींनी प्रेरणा घेतलेल्या एका उत्तम जगाची पुन्हा कल्पना करण्याची संधी साधू या अशी आहे. मुलींचा आवाज सर्वदूर पोहचवण्यासाठी आणि मुलींना सर्व प्रकारच्या शोषणापासून वाचवण्यात आघाडीवर असलेल्यांसाठी हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663390)
Visitor Counter : 116