दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करा’, या घोषवाक्यासह विशेष टपाल तिकीटाचे 5 ऑक्टोबर रोजी प्रकाशन
Posted On:
03 OCT 2020 6:46PM by PIB Mumbai
पणजी, 3 ऑक्टोबर 2020
गोवा टपाल विभागाकडून ‘कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करा’, या घोषवाक्यासह विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन 05.10.2020 रोजी करण्यात येणार आहे. कोविड-19 संक्रमण परिस्थितीत जनतेत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी जागृती निर्माण व्हावी, हा याचा उद्देश आहे. विशेष टपालतिकीटावर मजबूत प्रतिकारशक्तीसाठी सकस आहार, तंबाखूचा वापर टाळणे, नियमित व्यायामाच्या माध्यमातून तंदुरुस्त राहणे यावर भर देण्यात आला आहे.
गोवा टपाल विभागाच्या पणजी कार्यालयात 05/10/2020 ते 09/10/2020 आणि मडगाव कार्यालयात 12/10/2020 ते 16/10/2020 या कालावधीत विशेष टपाल तिकीट उपलब्ध असणार आहे. विशेष टपालतिकीटामुळे जनतेमध्ये कोविड-19 संक्रमण परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याविषयी जागृती होईल, अशी टपाल विभागाला आशा आहे.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661373)
Visitor Counter : 115