संरक्षण मंत्रालय
आयएनएस शिवाजी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान
Posted On:
02 OCT 2020 10:18PM by PIB Mumbai
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा भाग म्हणून, आयएनएस शिवाजी येथे 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2020 या काळात विविध उपक्रम राबवण्यात आले.या अंतर्गत, दुकानदार, सफाई कामगार,स्वयंपाकी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विघटन याबद्दल, व्याख्याने आणि सोशल मिडीयावरील संदेशांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली.


त्याशिवाय,एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी आणि संस्थेमध्येच घनकचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या गेल्या. संस्थेमधील सर्व कर्मचारी आणि अधिकारी, नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी ‘सामुदायिक श्रमदान’ करत, संस्थेच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला.

स्वच्छ भारत आणि पर्यावरण संरक्षण या संकल्पनांवर आधारित भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शालेय विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते.
.


या मोहिमेचा समारोप करताना, 2 ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. तसेच, स्टंप या स्वयंसेवी संस्थेसोबत आयएनएस शिवाजी संस्थेच्या कार्यालय आणि निवासी परीसरांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यावेळी एकून 500 रोपं लावण्यात आली.
सर्व उपक्रमांचे पालन करतांना कोविड विषयक नियम आणि सूचनांचे पूर्ण पालन केले गेले.
.




***
M.Iyangar/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661180)
Visitor Counter : 129