संरक्षण मंत्रालय

1 ऑक्टोबर 2020 रोजी 95 वा सैनिकी सुश्रुषा दिन


मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसने (एम एन एस) आपला 95 वा स्थापना दिन केला साजरा

Posted On: 01 OCT 2020 8:28PM by PIB Mumbai

पुणे, 1 ऑक्‍टोबर 2020


या दिवशी सर्व सुश्रुषा अधिकारी फ्लोरेन्स नाइटिंगेल शपथ वाचून आपल्या रूग्णांना उच्च दर्जाची  नि:स्वार्थ आरोग्य सेवा देण्यासाठी स्वतःला कटिबद्ध करतात. लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती, जनरल ऑफिसर कमांडिंग -इन चीफ दक्षिणी कमांड यांनी सैनिकी सुश्रुषा  सेवेला शुभेच्छा दिल्या आणि कोविड -19 विरोधात लढाईत त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. आपल्या संदेशात त्यांनी सर्व सैनिकी सुश्रुषा अधिकाऱ्यांचे देशसेवेप्रति त्यांच्या वचनबद्धतेबद्दल  कौतुक केले.

सशस्त्र  दलांमध्ये सैन्य सुश्रुषा सेवा ही एकमेव  महिला कॉर्प्स आहेत.  लष्करी रुग्णालयात नर्सिंग सेवा देण्यासाठी  28 मार्च 1888  रोजी मुंबईत दहा प्रशिक्षित ब्रिटीश परिचारिकांच्या पहिल्या तुकडीचे आगमन झाल्यानंतर याची स्थापना करण्यात आली. 1893 मध्ये याचे नाव इंडियन आर्मी नर्सिंग  सर्व्हिस (आयएएनएस) आणि  1902 मध्ये क्वीन अलेक्झांड्रा मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस (क्यूएएमएनएस) असे करण्यात आले. 1914 मध्ये प्रथमच परिचारिकाची नोंदणी  भारतात करण्यात आली आणि त्या क्वीन अलेक्झांड्रा मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसशी  जोडल्या गेल्या.

01,ऑक्टोबर 1926 रोजी भारतीय जवानांसाठी कायमस्वरूपी नर्सिंग सेवा स्थापन केली गेली आणि त्याला इंडियन मिलिटरी  नर्सिंग सेवा (आयएमएनएस) असे नाव देण्यात आले.  आयएमएनएसने प्रामाणिकपणे  सुरुवात केली आणि त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर प्रशंसा केली गेली.  15 सप्टेंबर 1943 रोजी आयएमएनएस अधिकारी भारतीय सैन्य दलात दाखल झाले आणि ते  कमिशनड ऑफिसर झाले.

सैनिकी सुश्रुषा सेवा हा सर्वोत्तम पेशापैकी एक  असून  19 व्या शतकाच्या  सुरुवातीच्या काळात एमएनएसच्या 55अधिकाऱ्यांच्या बळावर सुरु झाली आणि आज ती सैन्यदलाच्या  सेवा पुरवण्यास  सक्षम आहे.  या कॉर्प्सचे अधिकारी तिन्ही सेवादलाना सेवा पुरवतात.  दृढ वचनबद्धता आणि सतर्कतेसह हे अधिकारी आजारी, जखमी जवान  आणि त्यांच्या कुटूंबियांची देशभरात आणि परदेशात काळजी घेण्यात महत्वपूर्ण  भूमिका पार पाडत आहेत.

सध्याच्या  महामारीच्या परिस्थितीत पुणे गॅरीसनच्या नर्सिंग अधिकाऱ्यांनी  मानवजातीला नि: स्वार्थ सेवा पुरवून आरोग्य व्यवस्थेचा कणा असल्याचे सिद्ध केले आहे. नि: स्वार्थीपणा, प्रेमळपणा आणि तत्परतेमुळे सध्याची सुश्रुषा सेवा वैभवाच्या शिखरावर आहे.


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660795) Visitor Counter : 88


Read this release in: English