कृषी मंत्रालय

वर्ष 2020-21 हंगामातील महत्वाच्या खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अग्रीम अंदाज


खरीप हंगाम 2020-21मध्ये 144.52 दशलक्ष टन इतके विक्रमी अन्नधान्य उत्पादन

Posted On: 22 SEP 2020 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020

 

वर्ष 2020-21मधल्या खरीप हंगामातल्या पिकांचा पहिला अग्रीम अंदाज केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आज जाहीर केला आहे. राज्यांकडून आलेल्या आकडेवारीला इतर स्त्रोतांकडून प्रमाणित करुन घेत, हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  1. पहिल्या अग्रीम अंदाजानुसार, विविध पिकांचा 2020-21 वर्षातला अंदाज आणि 2005-06 पासूनची तुलनात्मक अंदाज सोबत जोडला आहे.
  2. पहिल्या अग्रीम अंदाजानुसार, खरीप हंगामातील महत्वाच्या पिकांचे उत्पादन खालीलप्रमाणे
    1. एकूण अन्नधान्य     –  144.52 दशलक्ष टन. (विक्रमी)
    2. धान  –  102.36  दशलक्ष टन.( विक्रमी)
    3. पोषक / भरड कडधान्ये–  32.84 दशलक्ष टन.
    4. मका  –  19.88 दशलक्ष टन.
    5. डाळी  –  9.31 दशलक्ष टन.
    6. तूर –  4.04 दशलक्ष टन.
    7. तेलबिया  –  25.73 दशलक्ष टन.
    8. शेंगदाणे  –  9.54 दशलक्ष टन. (विक्रमी)
    9. सोयाबीन  –  13.58 दशलक्ष टन.
    10. कापूस–  37.12 दशलक्ष गासड्या (170 किलो प्रत्येकी)
    11. ताग आणि मेस्ता - 9.66 दशलक्ष गासड्या (f 180 किलो प्रत्येकी)
    12. ऊस – 399.83 दशलक्ष टन
  3. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 16 सप्टेंबरपर्यंत मोसमी पाऊस 7% अधिक पडला आहे. त्यानुसार, बहुतांश महत्वाच्या पिकांच्या राज्यात सामान्य पाऊसमान होते. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार, यंदा बहुतांश राज्यात खरीपाचे पिक गेल्यावर्षीपेक्षा अधिक असेल.
  4. पहिल्या अग्रीम अंदाजानुसार, देशात यंदा खरीपाचे एकूण उत्पादन 144.52 दशलक्ष टन एवढे असणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या (2014-15 to 2018-19)सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदा 9.83 दशलक्ष टन अधिक उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.   
  5. खरीप धान (तांदळाचे) उत्पादन यंदा नादाजे 102.36 दशलक्ष टन एवढे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षांच्या (2014-15 to 2018-19)सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदा 6.70 दशलक्ष टन अधिक उत्पादन होण्याची अपेक्षा आहे .
  6. पोषक/भरड कडधान्यांचे उत्पादन अंदाजे  32.84 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असून ते सरासरी 31.39  दशलक्ष टनांपेक्षा 1.45 दशलक्ष टन अधिक आहे.  
  7. 2020-21 खरीप हंगामात,डाळींचे एकूण उत्पादन 9.31 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत, 1.59 दशलक्ष टन अधिक आहे.
  8. यंदाच्या खरीप हंगामात, देशभरात,  तेलबियांचे उत्पादन 25.73 दशलक्ष टन होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 3.41 दशलक्ष टन  अधिक असण्याचा अंदाज आहे.
  9. यंदाच्या खरीप हंगामात देशात ऊसाचे उत्पादन 399.83 दशलक्ष टन होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षीचे उत्पादन गेल्या पाच वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 39.40 दशलक्ष टन अधिक आहे.  
  10. यंदाच्या खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन 37.12 दशलक्ष गासड्या इतके आहे, जे गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.63 दशलक्ष गासड्या अधिक आहे.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा


* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1657943) Visitor Counter : 289


Read this release in: English , Hindi