जलशक्ती मंत्रालय

पुरामुळे झालेले नुकसान

Posted On: 17 SEP 2020 9:09PM by PIB Mumbai

 

देशाला पुरासारख्या नैसर्गिक संकटांचा जवळपास दरवर्षी सामना करावा लागतो. काही हा फटका कमी असतो तर काही जास्त, मात्र त्यामुळे देशात जीवित आणि वित्तहानीही होते.पूर येण्यामागे विविध कारणे असून, त्यात मुसळधार पाऊस, सरासरीपेक्षा अधिक आणि बराच काळ येणे, नद्यांची पाणी वाहून नेण्याची मर्यादित क्षमता, नदीपात्रांत गाळ जमा होणे आणि नदीकाठांवरील जमिनीची धूप, भूस्खलन, पूरप्रवण क्षेत्रात पाणी वाहून जाण्याची व्यवस्था निकृष्ट असणे, हिम वितळणे आणि ग्लेशियरवरुन हिमनदीचे पाणी वाहत येणे, अशी करणे सांगता येतील.

जमिनीची धूप थांबवण्यासाठीच्या योजना, नव्या संरक्षण भिंतींचे बांधकाम, सध्या असलेल्या संरक्षक भिंतींची उंची क्षमता वाढवणे, अशा उपाययोजना संबधित राज्यसरकारांकडून प्राधान्याने केल्या जात आहेत. केंद्र सरकारही राज्य सरकारच्या या प्रयत्नांना मदत म्हणून त्यांना आवश्यक ते तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन देत आहे, त्याशिवाय, महत्वाच्या ठिकाणी पुराच्या व्यवस्थापनासाठी वित्तीय सहाय्यही दिले जात आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या जलसिंचन आणि जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधून गोमती नदीत पाणी येत नसून, गोमती नदीला आलेल्या पुराच्या काळात मोठी हानी झाल्याची माहिती नाही.

उत्तरप्रदेश सरकारच्या जलसिंचन आणि जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, गोमती नदीवर ब्धारण बांधण्याची कोणतीही योजना नाही. 

केंद्रीय जल शक्ती आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655901) Visitor Counter : 111


Read this release in: English , Tamil