शिक्षण मंत्रालय

समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची समान संधी देण्या साठी सरकार वचनबद्ध

Posted On: 17 SEP 2020 8:01PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकार समाजातील सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची समान संधी देण्यास कटिबद्ध आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचे स्त्रोत दिले जात आहेत हे उपक्रम म्हणजे, स्वयम, स्वयंप्रभा, दीक्षा, ई-पाठशाला, ई-पीजीपाठशाला, आभासी प्रयोगशाळा, राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी (NDL) आणि राष्ट्रीय मुक्त शिक्षण स्त्रोत भांडार (NROER). पीएम ई-विद्या या सर्वसमावेशक उपक्रमाद्वारे सर्व डिजिटल/ऑनलाईन/ऑनएअर शिक्षणाशी संबधित सर्व उपक्रमांना जोडून बहु-पर्यायी शिक्षण व्यवस्थेची तरतूद केली आहे. हे उपक्रम पुढीलप्रमाणे :-

i. NIRF किंवा NAAC क्रमवारीत 3.26  गुणांसह पहिल्या 100 उच्चशिक्षणसंस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची मुभा आहे. NAAC चे 3.01 ते 3.25 इतके गुण मिळवणाऱ्या शिक्षणसंस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगीने ऑनलाईन शिक्षण सुरु करता येईल. 

ii. पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी, पदवी अभ्यासक्रमांचे ऑनलाईन मजकूर 20 ते 40 टक्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

iii.  दीक्षा, या राष्ट्रीय डिजिटल पायाभूत व्यवस्थेद्वारे, शालेय शिक्षणासाठी उच्च दर्जाचे ई कन्टेन्ट राजेय आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले गेले असून QR कोडच्या मदतीने पाठ्यपुस्तके मिळवण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

iv. इयत्ता पहिली ते बारावी साठीची अध्ययन साधने स्वयंप्रभावर 12 वाहिन्यांना प्रायोगिक तत्वावर देण्यात आली असून, या सर्व वाहिन्या पूर्णपणे सुरु करण्याचे प्रयत्न वेगाने होत आहेत. 

v.  रेडीओ, कम्युनिटी रेडीओ आणि सीबीएसई- पॉडकास्ट-शिक्षा वाणी चा व्यापक वापर

vi. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (DAISY)  आणि NIOS च्या संकेतस्थळावर विशेष ई कन्टेन्ट विकसित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ज्ञान अंतरजाल- NKN साठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग MeitY सोबत आर्थिक तरतूद करत आहे.

(c) शिक्षक आणि व्याख्यात्यांसाठी क्षमता बांधणी चे उपाय म्हणून केंद्र सरकार शालेय शिक्षकांसाठी निष्ठातसेच उच्च शिक्षणासाठी अर्पितकार्यक्रम राबवत आहे.  त्याशिवाय, शिक्षणसंस्थाही आपापल्या शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी तयार करण्यासाठी उपक्रम राबवत आहेत.

NKN साठी शिक्षण मंत्रालय इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधत आहे.स्वयंप्रभा वाहिन्या DD च्या सर्व ग्राहकांसाठी देशभर मोफत उपलब्ध आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655820) Visitor Counter : 207


Read this release in: English , Bengali , Tamil , Kannada