गृह मंत्रालय
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा
Posted On:
17 SEP 2020 5:09PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे, “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन उर्वरित देशाशी जोडला गेला. ह्या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व ज्ञात-अज्ञात अमर वीरांना नमन”.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी जुन्या हैदराबाद प्रांतातील लोकांना- ज्यात आजच्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा मधील काही भागांचा समावेश होता- निजाम राजवटीतून मुक्ती मिळवण्यासाठी आणखी 13 महिने आणि दोन दिवस वाट बघावी लागली होती. शेवटी, ‘ऑपरेशन पोलो’ राबवून, 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भाग निजाम राजवटीतून मुक्त होत, स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला.
Amit Shah
@AmitShah
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन उर्वरित देशाशी जोडला गेला. ह्या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व ज्ञात-अज्ञात अमर वीरांना नमन ! #मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
Translate Tweet
2:20 PM · Sep 17, 2020·Twitter for iPhone
या स्वातंत्र्यलढयासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले. मराठवाडयातील अनेक नेते या संग्रामाचे नेतृत्व करत होते. यात, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, पी एच पटवर्धन अशा मोठ्या नेत्यांचा समावेश होता.
या मुक्तीसंग्रामाचे प्रतिक म्हणून परभणी येथे एक स्मृतीस्तंभ उभारण्यात आला आहे.
मराठवाडा स्वातंत्र्यसैनिक स्मारक परभणी
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655669)
Visitor Counter : 380